Saturday, October 18, 2025
Home कॅलेंडर धक्कादायक! हॉटेलच्या रूममध्ये मिळाला ‘या’ कॉमेडियनचा मृतदेह, संशयास्पद मृत्यूचा पोलीस करतायत तपास

धक्कादायक! हॉटेलच्या रूममध्ये मिळाला ‘या’ कॉमेडियनचा मृतदेह, संशयास्पद मृत्यूचा पोलीस करतायत तपास

हॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अमेरिकन कॉमेडियन बॉब सगेट (Bob Saget) यांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह एका हॉटेलमध्ये सापडला. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बॉब सगेटच्या मृत्यूच्या बातमीने त्यांचे चाहते हादरले आहेत आणि सोशल मीडियावर त्याच्या कॉमेडीच्या क्लिप शेअर करून त्यांची आठवण काढत आहेत.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी काहीही संशयास्पद आढळले नाही. जे खून किंवा जबरदस्ती दर्शवू शकते. हॉटेलच्या खोलीतून कोणत्याही प्रकारचे अं’मली पदार्थ जप्त करण्यात आले नाही. रविवारी (९ जानेवारी) दुपारी ४ वाजता हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना बॉब सगेटचा मृतदेह सापडला. (us comedian bob saget found dead in a florida hotel room)

बॉब सगेटला त्यांच्या ‘फुल हाऊस’ टीव्ही शोसाठी ओळखले जाते. हा शो १८८७ ते १९९५ पर्यंत प्रसारित झाला. या शोद्वारे त्यांनी करोडो प्रेक्षकांची मने जिंकली. शिवाय त्यांनी अनेक टीव्ही शो होस्टही केले आहेत.

बॉबचा जन्म १७ मे १९५६ रोजी अमेरिकेतच झाला. २०१४ मध्ये त्यांनी ‘डर्टी डॅडी’ नावाने त्यांचे पुस्तक लॉन्च केले होते. एवढ्या महान कलाकाराचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन होणे त्यांच्या चाहत्यांसाठी दु:खद आहे. दिवंगत कॉमेडियनला सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा