Friday, September 20, 2024
Home मराठी मालवणी भाषेचा अवमान केल्यामुळे, वैभव चव्हाणने भाऊच्या धक्क्यावर मागितली महाराष्ट्राची माफी

मालवणी भाषेचा अवमान केल्यामुळे, वैभव चव्हाणने भाऊच्या धक्क्यावर मागितली महाराष्ट्राची माफी

यावर्षी बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन खूपच रंगत आलेला आहे. नुकताच काल शनिवारी भाऊचा धक्का पार पडलेला आहे. या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने सगळ्या सदस्यांची चांगलीच शाळा घेतलेली आहे. यावेळी अरबाज पटेल हा कॅप्टन झालेला आहे. यावेळी दोन टीम पडलेल्या होत्या. एका टीममध्ये निक्की, जानवी, अरबाज वैभव यांना रितेश देशमुख हे चांगलेच धारेवर धरलेले होते.

बिग बॉसच्या घरामध्ये लहान बाळ सांभाळण्याचा टास्क आला होता. त्यावेळी अंकिता वालावलकर हिने मालवणी भाषा वापरली होती. याबद्दल वैभव तिला म्हणाला होता की, “मालवणी ही मराठी भाषा नाही” यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच गदारोळ झालेला होता. मालवणी भाषेचा अपमान केला आहे. असे देखील सगळेजण म्हणत होते. तसेच वैभवने मालवणी भाषेची माफी मागावी अशी महाराष्ट्रातील सगळ्या जनतेची इच्छा होती रितेश देशमुखने सगळ्यांची ही इच्छा पूर्ण केलेली आहे.

या सगळ्या घडल्या प्रकाराने रितेश देशमुखने देखील वैभवला चांगले धारेवर घेतले आणि त्याला सगळ्यांची माफी मागायला सांगितली. यावेळी देशमुख वैभवला म्हणाला की, “तुम्ही टास्क जिंकण्याच्या नादात मालवणी आणि मराठीमध्ये एक रेष ओढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सगळ्यांना खूप वाईट वाटले आहे.” यानंतर वैभवला देखील त्याची चूक समजली आणि त्याने सर्वांची हात जोडून माफी मागितली. यावर तो म्हणाला की, “असं काही माझ्या मनात अजिबात नाहीये. परंतु यामुळे कोणाला दुःख वाटले असेल, तर मी सगळ्यांना सॉरी म्हणतो.” यासोबतच त्याने अंकिताची देखील माफी मागितली. यावर रितेश त्याला म्हणाला की, “विचार करून बोलायला शिका बोलून झाल्यावर विचार केला तर त्याचा काहीच उपयोग होत नाही.”

रितेश देशमुखने केलेल्या या वक्तव्यनंतर वैभवला देखील त्याची चूक समजली मालवणी ही मराठीची उपभाषा आहे. आपण जिथे जाऊ तिथे भाषा बदलत असते. भाषेचा टोन बदलत असतो. या सगळ्याची माहिती देखील रितेश देशमुखने घरातील सदस्यांना दिलेली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

‘नवरोबा मला तुझा गर्व आहे,’ या कारणासाठी जिनिलियाने केले रितेशची कौतुक
प्रेक्षकांच्या नजरेत तुमचा गेम ओव्हर झाला आहे! रितेशने सुनावले वैभवला खडे बोल…

हे देखील वाचा