Wednesday, July 2, 2025
Home मराठी अभिनेता वैभव तत्ववादीने वाढदिवशी केली आगामी प्रोजेक्टची घोषणा; ‘या’ अभिनेत्रीसोबत करणार स्क्रीन शेअर

अभिनेता वैभव तत्ववादीने वाढदिवशी केली आगामी प्रोजेक्टची घोषणा; ‘या’ अभिनेत्रीसोबत करणार स्क्रीन शेअर

लॉकडाऊननंतर अनेक नवीन चित्रपटांची घोषणा झाली आहे. अनेक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील दोन लोकप्रिय कलाकार एकत्र आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार आहेत. ते म्हणजे अभिनेता वैभव तत्ववादी आणि लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे होय. हे दोघेही त्यांच्या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. याची माहिती दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रेक्षकांना दिली आहे. शनिवारी (२५ सप्टेंबर) वैभव त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने त्याने ही गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे.

वैभवने ऋतासोबत कारमधील काही फोटो शेअर इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “माझ्या वाढदिवशी माझ्या नवीन प्रोजेक्टची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. ऋतासोबत काम करताना खूप मजा येणार आहे. बाकी माहिती लवकरच येईल.” (Vaibhav Tatwawadi and hruta durgule will appear together in their upcoming project)

त्याने शेअर केलेल्या या फोटोवर अनेकजण प्रतिक्रिया देऊन त्याच्या आगामी प्रोजेक्टला शुभेच्छा देत आहेत. तसेच त्याला वाढदिवसाच्या देखील शुभेच्छा देत आहेत. ऋताने त्याच्या या पोस्टवर हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे, तर ऋताने देखील वैभवसोबत काही फोटो शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांच्या नवीन प्रोजेक्टबाबत माहिती दिली आहे.

वैभव आणि ऋता हे दोघेही खूप लोकप्रिय कलाकार आहेत. वैभवने अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘कुरुक्षेत्र’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘शॉर्टकट’, ‘मिस्टर एँड मिसेस सदाचारी’, ‘चिटर’, ‘कान्हा’, ‘भेटली तू पुन्हा’, ‘व्हॉट्सऍप लग्न’, ‘रेडीमिक्स’ या मराठी चित्रपटात काम केले आहे. यासोबत त्याने अनेक हिंदी चित्रपटात देखील महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.

ऋताने अगदी निवडक मालिकांमध्ये काम केले आहे, पण तिची लोकप्रियता कोणत्याही मोठ्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये. सोशल मीडियावर तिची लाखांमध्ये फॅन फॉलोविंग आहे. तिने ‘दुर्वा’, ‘फुलपाखरू’ या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सौंदर्य ही शक्ती, तर स्माईल त्याची तलवार!’ वैदेही परशुरामीचे रूप पाहुन हरपले चाहत्यांचे भान

-पुण्यातून इंजीनियरिंगचे शिक्षण घेणारा वैभव तत्ववादी ‘असा’ बनला प्रसिद्ध अभिनेता; रंजक आहे त्याचा प्रवास

-सोनम कपूरच्या आयुष्यात ‘Someone special’ची एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘तयार व्हा’

हे देखील वाचा