अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या महिलांसाठी १९८० साली धर्मात्मा सरण यांनी एक सौंदर्य स्पर्धा चालू केली होती. या स्पर्धेचे नाव ठेवले गेले होते मिस इंडिया यूएसए. दरवर्षी ही स्पर्धा घेतली जाते. ४० वर्षांपासून सुरू असलेली ही स्पर्धा नुकतीच पार पडली. या वर्षी मिस इंडिया यूएसएचा ताज २५ वर्षीय वैदेही डोंगरेने जिंकला आहे.
मिशिगनच्या २५ वर्षीय वैदेही डोंगरे २०२१ सालच्या ‘मिस इंडिया यूएसए २०२१’ ची मानकरी ठरली आहे. वैदेहीने मिशिगनमधून तिची पदवी प्राप्त केली असून, सध्या ती एका मोठ्या कंपनीत बिजिनेस डेव्हलपर म्हणून काम करते. वैदेही या स्पर्धेची विजेता ठरली, तर जॉर्जियाची अर्शी लालानीने या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला आहे.
ही स्पर्धा जिंकल्यानंतर वैदेहीने सांगितले की, “मला आपल्या समाजावर सकारात्मक प्रभाव पाडायचा आहे आणि महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासह साक्षरतेवरही काम करायचे आहे.
वैदेहीला तिच्या सुंदर शास्त्रीय कथ्थक नृत्यासाठी ‘मिस टॅलेंटेड’ हा किताब देखील देण्यात आला, तर दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या वीस वर्षीय अर्शीला ब्रेन ट्युमर झाला होता. या आजारावर यशस्वी मात करत तिने या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला. या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर उत्तर कॅरोलिनाची मीरा कासारी आली आहे.
या स्पर्धेसाठी १९९७ साली मिस वर्ल्ड असणारी डायना हेडन मुख्य अतिथी आणि मुख्य परीक्षक होती. या स्पर्धेमध्ये ३० राज्यातील ६१ स्पर्धकांनी ‘मिस इंडिया यूएसए’, ‘मिसेज इंडिया यूएसए’ आणि ‘मिस टीन इंडिया यूएसए’ या तीन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. या तीन स्पर्धेतील विजेत्यांना विश्व स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी मुंबईचे तिकीट देखील दिले गेले.
धर्मात्मा सरन आणि नीलम सरन या जोडप्याने सुरू केलेली ‘मिस इंडिया यूएसए’ ही स्पर्धा, भारताबाहेर चालणाऱ्या सर्वात जास्त लोकप्रिय आणि अधिक कालावधीसाठी चालणाऱ्या स्पर्धांपैकी एक आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस
-वैदेही परशुरामी विचारतेय, ‘कॉफी घेणार का?’; व्हायरल होतेय लेटेस्ट पोस्ट