Thursday, March 13, 2025
Home अन्य ‘सौंदर्य ही शक्ती, तर स्माईल त्याची तलवार!’ वैदेही परशुरामीचे रूप पाहुन हरपले चाहत्यांचे भान

‘सौंदर्य ही शक्ती, तर स्माईल त्याची तलवार!’ वैदेही परशुरामीचे रूप पाहुन हरपले चाहत्यांचे भान

आपल्या अभिनयाने आणि सुंदरतेने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजेच वैदेही परशुरामी. अभिनयाशिवाय ही अभिनेत्री नृत्य कलेतही पारंगत आहे. तिने तिच्या प्रतिभेच्या जोरावर बरेच नाव कमावले आहे. वैदेही सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय आहे. वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून, नेहमीच ती चाहत्यांचे लक्ष वेधते. आता पुन्हा वैदेहीचा एक फोटो चाहत्यांमध्ये चर्चा रंगवत आहे.

वैदेहीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यात अभिनेत्री कमालीची सुंदर दिसत आहे. यात तुम्ही पाहू शकता की, तिने फिकट गुलाबी रंगाचा स्लिव्हलेस गाऊन घातला आहे. कानात इअरिंग घालून, तिने सगळे केस मागे बांधले आहेत. यातील तिचा मेकअपही अगदी परफेक्ट आहे. एकंदरीत वैदेहीला या लूकमध्ये पाहुन चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. (vaidehi parshurami’s latest glamorous photo goes viral)

हा फोटो शेअर करत वैदेही म्हणतेय की, “सौंदर्य ही शक्ती आहे, स्माईल त्याची तलवार आहे!” अभिनेत्रीचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अगदी कमी कालावधीत या फोटोवर २४ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर कमेंट बॉक्समध्ये चाहते तिच्यात सौंदर्याचे भरभरून कौतुक करत आहेत.

वैदेहीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘वेड लावी जीवा’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. अमिताभ बच्चन अभिनित ‘वझीर’ या हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. याशिवाय ‘सिम्बा’मध्ये तिने रणवीर सिंगच्या बहिणीची भूमिका साकारली होती. आता अभिनेत्री लवकरच ‘झोंबिवली’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चार वर्षांची असताना दिव्या दत्ताने पाहिले होते ‘हे’ स्वप्न; ‘अशा’प्रकारे ‘शब्बो’ने मारली रुपेरी पडद्यावर एन्ट्री

-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज

हे देखील वाचा