वरुण धवन हा सिनेसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात त्याने आपली बालमैत्रिण नताशा दलालसोबत लग्न केले होते. त्यांच्या या लग्नाची जोरदार चर्चा त्यावेळी माध्यमांमध्ये रंगली होती. याच पार्श्वभूमीवर लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त वरुणने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन फोटो शेअर करत नताशाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या लग्नातील या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
वरुण धवन (varun dhawan) आणि नताशा दलाल यांच्या प्रेमप्रकरणाची कथा एखाद्या चित्रपटासारखीच आहे. दोघेही अगदी लहानपणापासून एकमेकांचे मित्र होते. वयाच्या २० व्या वर्षापर्यंत ते चांगले मित्र होते मात्र त्यानंतर त्यांना आपलं नात आता मैत्रीपुरते मर्यादित राहिले नसून त्यापुढे गेल्याची जाणीव झाली. याबद्दलचा खुलासा नताशाने एका मुलाखतीत बोलताना केला होता.
करिना कपूरच्या एका कार्यक्रमात याबद्दल बोलताना वरुणने सांगितले की, ”आमची पहिली भेट झाली तेव्हा नताशा सहावीत होती. तेव्हापासून ते अगदी कॉलेजच शिक्षण घेईपर्यंत आम्ही खूप चांगले मित्र होतो. मात्र ज्यावेळी नताशाला मी प्रपोज केला.” त्यावेळी तिने अनेकदा नकार दिल्याचही वरुणने यावेळी सांगितले. याबद्दल पुढे बोलताना तो म्हणाला की, त्यांच्या प्रेमाची सुरुवात बास्केटबॉलच्या मैदानावरुन झाली होती. त्यावेळी नताशाला पहिल्यांदा पाहिले आणि प्रेमात पडलो.
या दोघांनीही २४ जानेवारी २०२१ मध्ये एकमेकांशी लग्नगाठ बांधली. कोरोनाच्या परिस्थितीत हा लग्नसोहळा पार पडल्याने अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली होती. अलिबागमधील एका आलिशान महालात हा विवाहसोहळा पार पडला. कोरोनामुळे फक्त ५० लोकांना या लग्नाचे आमंत्रण देण्यात आले होते. विशेष म्हणजे चित्रपटक्षेत्रातील कलाकारही या सोहळ्यात दिसून आले नाहीत.
दरम्यान वरुण धवन हा सध्या सिनेसृष्टीत लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखला जात असून त्याने करण जोहरच्या ‘स्टु़डंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर ‘मै तेरा हिरो’, ‘कलंक’, ‘कुली नं १’ , ‘दिलवाले’ , ‘बदलापूर’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटात त्याने भूमिका साकारल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा :
जेव्हा वरुण धवनच्या भावाने खुलेआम मारल्या होत्या ६ वेळा कानशिलात, अभिनेत्याने स्वतः केला खुलासा
दुःखद! प्रसिद्ध स्क्रीन रायटर जॉन पॉल यांचे निधन, २ महिने होते रुग्णालयात दाखल
घरात शाहरुख खानवर ‘अशी’ ओरडते पत्नी गौरी, ‘त्या’ व्हिडिओने उघड केल्या प्रायव्हेट गोष्टी