×

घरात शाहरुख खानवर ‘अशी’ ओरडते पत्नी गौरी, ‘त्या’ व्हिडिओने उघड केल्या प्रायव्हेट गोष्टी

बॉलिवूडचा किंवा शाहरुख खान (Shahrukh Khan) रोमान्ससाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर शाहरुख खानची पत्नी गौरी खानसोबतची (Gauri Khan) केमिस्ट्री सर्वांनाच आवडते. गौरी आणि शाहरुख दोघेही एकमेकांची खूप काळजी घेतात. त्याचवेळी, आता किंग खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात मुलगी सुहाना खान (Suhana Khan) गौरीची नक्कल करताना दिसत आहे.

सुहानाचा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल
सुहानाने आई गौरीची अशी नक्कल केली की, जे पाहून हे सहज लक्षात येते की, गौरी घरात पूर्णपणे शिस्त पाळयला लावते. ती शाहरुख खानच्या खाण्यापिण्यापासून ते प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींची काळजी घेते. व्हिडिओमध्ये गौरीची नक्कल करत, गौरी शाहरुखवर कशी ओरडते, हे सुहाना सांगत आहे. सुहाना खूप लहान असतानाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडीओमध्ये पाहून असे दिसते की ती ६-७ वर्षांची असावी. यामध्ये ती वडील शाहरुख खानसोबत दिसत आहे. (suhana khan revelas how mommy gauri khan yells at shah rukh khan at home)

वडिलांसोबत केली मस्ती
सुहाना खानचा हा बालपणीचा व्हिडिओ खूपच क्यूट आहे, ज्यामध्ये ती वडील शाहरुख खानसोबत ऑफिसमध्ये दिसत आहे. तसेच ती तिच्या वडिलांसोबत खूप मस्ती करताना दिसत आहे.

सुहानाचे बॉलिवूड पदार्पण
सुहानाचा जन्म २००० साली झाला आणि ती आता २२ वर्षांची आहे. शाहरुख खानची लाडकी सुहाना खान आजकाल सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. तिने एखादी पोस्ट केली, तर ती व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. सुहाना झोया अख्तरच्या चित्रपटातून लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post