Thursday, March 28, 2024

दुःखद! प्रसिद्ध स्क्रीन रायटर जॉन पॉल यांचे निधन, २ महिने होते रुग्णालयात दाखल

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ मल्याळम निर्माते आणि लेखक जॉन पॉल (John Paul) यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. जॉन पॉल यांनी शनिवारी (२३ एप्रिल) दुपारी १ वाजता केरळमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या रुग्णालयात त्यांच्यावर दीर्घकाळ उपचार सुरू होते, मात्र आज दुपारी त्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, जॉन पॉल गेल्या दोन महिन्यांपासून या रुग्णालयात दाखल होते. मात्र शुक्रवारी (२२ एप्रिल) अचानक त्यांची तब्येत बिघडली, त्यानंतर आज त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. अलीकडेच, जॉन पॉलच्या उपचारासाठी त्यांच्या मित्रांनी आणि हितचिंतकांनी सोशल मीडियावर पैसे जमा केले. यावेळी केरळ सरकारनेही पुढे येऊन २ लाख रुपयांची मदत केली. (malayalam producer and screen writer john paul passed away)

त्याचवेळी आता त्यांच्या निधनानंतर चित्रपट जगतातील लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मल्याळम अभिनेता कुंचक्को बोबनने (Kunchacko Boban) त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून, जॉन पॉल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने लिहिले की, “त्यांनी अनेक हृदयस्पर्शी चित्रपटांची निर्मिती केली आहे. ते सर्वांच्या हृदयात जिवंत राहतील.”

जॉन पॉल यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी त्यांच्या आयुष्यात १०० हून अधिक चित्रपट लिहिले आहेत, ज्यामध्ये अनेक सुपरहिट ठरले. ‘नाम चमरम’, ‘यात्रा’ आणि ‘विदा परयुम मुंबे’ या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. एवढेच नाही तर त्यांनी भारतन, सत्यन एंथिक्कड़ आणि जोशी यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबतही काम केले. याशिवाय जॉन पॉल यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा