Monday, October 14, 2024
Home बॉलीवूड वरुण धवनची क्रश हाेती सानिया मिर्झा, सांगितला पहिल्या भेटीचा रंजक किस्सा

वरुण धवनची क्रश हाेती सानिया मिर्झा, सांगितला पहिल्या भेटीचा रंजक किस्सा

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन २४ एप्रिल रोजी ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘स्टु़डंट ऑफ द इयर’ मधून २०१२ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या वरुण धवनने अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. वडील डेव्हिड धवन हे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक असूनही वरुणने मेहनतीने बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. त्याला डेव्हिड धवन यांच्याकडून चित्रपटसृष्टीचा वारसा मिळालेला असला तरी त्याला काम मिळवण्यासाठी आणि सुपरहिट चित्रपटांसाठी अपार कष्ट घ्यावे लागलेले आहेत. दरम्यान, वरुणने त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील एक घटना उघड केली आहे जी त्याच्या पहिल्या पगाराशी आणि सानिया मिर्झा हिच्याशी संबंधित आहे. काय आहे किस्सा? चला जाणून घेऊया…

अभिनेता वरुण धवन (varun dhawan) नुकताच ‘भेडिया’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यूएईला गेला होता. या प्रमाेशनदरम्यान अभिनेत्यानं मुलाखतीत त्याच्या पहिल्या पगाराबद्दल आणि क्रशबद्दल खुलासा केला. अभिनेत्याने सांगितले की, “त्याला सानिया मिर्झा खूप आवडायची. मात्र, सानियासोबतची त्याची पहिली भेट फारशी विशेष नव्हती.” वरुण सांगतो की, “एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान तो सानियाला पहिल्यांदा भेटला होता आणि त्यादरम्यान तो खूप घाबरला होता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

वरुणने सांगितले की, “सानियाने मला सफरचंद आणण्यास सांगितले होते. मला सफरचंद मिळाले पण ते सफरचंद देताना माझे हात थरथरू लागले. थरथरत्या हातांनी मी कसेतरी ते सफरचंद सानियाच्या आईला देण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने मला खडसावले आणि म्हणाल्या, ‘हे सफरचंद कोणी आणायला सांगितले, सानिया सफरचंद खात नाही.’ पण परिस्थिती आणखी बिघडण्याआधीच सुदैवाने सानिया तिथे पोहोचली. सर्व जबाबदारी स्वत:वर घेत तिने प्रकरण शांत केले. आणि मुलाखतीदरम्यान जेव्हा वरुणला त्याच्या पहिल्या पगाराबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याला एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी पाच हजार रुपये मिळत असल्याचे त्याने सांगितले.

वरुण धवन याच्या काराकीर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्याने ‘स्टुंडट ऑफ द इयर’, ‘बवाल’, ‘भेडीया’, ‘मैं तेरा हिराे’ यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले. (bollywood actor varun dhawan tells that his crush sania mirza mother scold him for apple actor revealed about his first salary)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

BIRTHDAY SPECIAL |शाहरुख- काजोललाही आपल्या इशाऱ्यावर नाचवणाऱ्या वरुण धवनचा असा आहे सिनेसृष्टीतील प्रवास, एकदा नजर टाका

‘किसी का भाई किसी की जान’ला मिळणारा प्रतिसाद पाहून सलमान केले भावुक ट्विट म्हणाला…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा