Tuesday, April 23, 2024

मुलीसोबत खोलीत पकडल्यावर भाऊ रोहितने वरुण धवनला मारल्या होत्या सहा कानाखाली, वाचा तो किस्सा

साल २०१२ मध्ये ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या वरुण धवनने, अत्यंत कमी कालावधीत चित्रपटीसृष्टीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्याने मोठ्या पडद्यावर चॉकलेट बॉयपासून ते गंभीर पात्र अत्यंत उत्तमरीत्या पार पाडले आहेत. वरुण धवन लवकरच अमर कौशिक दिग्दर्शित ‘भेडिया’ या चित्रपटात दिसणार आहे. अलीकडेच या चित्रपटातील त्याचा पहिला लूक समोर आला आहे, ज्यात तो अगदी वेगळा दिसत आहे. चाहत्यांना त्याचा हा लूक खूप आवडला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

वडील डेव्हिड धवन यांच्या समोर उघड केले मोठे रहस्य
वरुण धवनने एका शोदरम्यान त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले होते. वरुणने अनुपम खेरसमोर अशी काही गुपिते उघड केली, जे ऐकुण तिथे उपस्थित त्याचे वडील डेव्हिड धवनही आश्चर्यचकित झाले. वरुण म्हणाला, “मी एकदा एक मुलीबरोबर खोलीत होतो आणि बाहेरून दरवाजा वाजला. त्या मुलीने आत येऊन मला सांगितले की, बाहेर माझा भाऊ आला आहे. हे ऐकल्यावर मी चांगलाच थरथरलो होतो.” (varun dhawan revealed that he slapped by his brother rohit)

रोहित धवनने मारली कानाखाली
वरुण धवनने आपला भाऊ रोहित धवनबद्दल खुलासा करत पुढे सांगितले की, तो खोलीतून बाहेर येताच त्याच्या भावाने काहीही न ऐकता त्याच्या कानाखाली मारली. वरुण म्हणाला की, “आम्ही चालत होतो आणि आम्ही दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच रोहितने मला आणखी एकदा कानाखाली मारली. हे पाहून मी स्तब्ध झालो. मी रोहितला म्हणालो की, हे सगळं मम्मी-पप्पाला सांगू नको. मी त्याला विनंती केली.”

वरुणला लगावल्या सहा कानाखाली
वरुण म्हणाला की, “आम्ही सहाव्या मजल्यावर पोहचताच भाईने मला पुन्हा एकदा कानाखाली मारली. तो मला प्रत्येक मजल्यावर एक एक कानाखाली मारत होता आणि खाली येता येता त्याने मला सहावेळा कानाखाली मारली. म्हणून मला वाटलं की, भावाने मारलंय तर आई-वडिलांना काही फरक पडणार नाही. मला वाटलं की, रोहितने मला एवढं मारलंय, तर तो त्याबद्दल मम्मी-पप्पाला काहीतरी कारण देईल. पण तो वर गेला आणि सर्वांना सर्व काही सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

डेव्हिड धवन लागले हसू
वरुण धवनचे बोलणे ऐकूण अनुपम खेर हसणे थांबू शकले नाहीत. तर डेव्हिड धवनही जोरात हसू लागले. वरुण पुढे म्हणाला, “रोहित मम्मी-पप्पांकडे गेला आणि म्हणाला की. हा माझं नाव खराब करत आहे. याच्या खोलीत मुलगी होती. त्याला उत्तर देताना मी म्हणालो, काय नाव खराब करतोय? तू माझ्यापेक्षा फक्त चार वर्षांनी मोठा आहेस.”

वडील आणि भावाबरोबर केलंय काम
वरुण धवनला करण जोहरने हिंदी चित्रपटसृष्टीत लॉंच केले असले, तरी त्याने वडील डेव्हिड धवन यांच्याबरोबर ‘मै तेरा हिरो’, ‘जुडवा २’ आणि ‘कुली रिबूट’मध्ये काम केले. शिवाय त्याने त्याचा भाऊ रोहित धवनच्या ‘ढिशूम’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. यात त्याच्यासोबत जॅकलीन फर्नांडिस आणि जॉन अब्राहम होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

BIRTHDAY SPECIAL |शाहरुख- काजोललाही आपल्या इशाऱ्यावर नाचवणाऱ्या वरुण धवनचा असा आहे सिनेसृष्टीतील प्रवास, एकदा नजर टाका

‘किसी का भाई किसी की जान’ला मिळणारा प्रतिसाद पाहून सलमान केले भावुक ट्विट म्हणाला…

हे देखील वाचा