बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण शर्मा याने खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात मोठं स्थान निर्माण केलं आहे. सध्या अभिनेत्याला इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याने आपल्या दमदार अभिनयाने आणि कॉमेडी अंदाजाने चित्रपटांमध्ये जिवंतपणा आणला आहे. कॉमेडी करण्याचं कौशल्य आणि चेहऱ्यावरच्या स्मित हास्यावर चाहते वरुनवर फिदा होतता. त्याने ‘छिछोरे‘ आणि ‘फुकरे रिटर्न‘ सारख्या चित्रपटांमधूनच प्रेक्षकांची मनं जिंकली. आज अभिनेता इंडस्ट्रीमधील एक झगमगणारा तारा असला तरी त्याच्या आयुष्यामध्येही संघर्षाचे दिवस पाहावे लागले होते. त्याने आपल्या अभिनय आणि संघर्षाच्या जोरावर यशाचं शिखर गाठलं आहे. आज (दि, 4 फ्रेब्रुवरी) रोजी अभिनेता आपला जन्मदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी वरुणच्या आयुष्यामधील काही खास गोष्टी जाणून घेऊया.
अभिनेता वरुन शर्मा (Varun Sharma) याने सुरुवातीपासूनच कॉमेडी भूमिका निभावल्या आहेत. वरुनने इंडस्ट्रीमध्ये 9 वर्षाच्या करिअरमध्येच अनेक कौतुकास्पद आणि लक्षात राहाणाऱ्या भूमिकांनी प्रेक्षकांना हसवलं आहे. मात्र, अभिनेत्यााने हे सुगीचे दिवस पाहाण्यासाठी अनेक संघर्षाचा सामना केला आहे. चित्रपटांमध्ये काम मिळण्यासाठी खूप धक्केही खावे लागले होते. वरुणने एका मुलाखतीदरम्यान त्याच्या संघार्षाबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या. फिल्म इंडस्ट्रीमध्ये जागा मिळवण्यासाठी त्याला दिग्दर्शाकाच्या धोक्याचाही सामना कारावा लागला होता अशी परिस्थिती आली होती की, वरुणनला रंग मारण्याच्या डब्ब्यामध्ये जेवन कारावं लागलं होतं.
वरुणने मुलाखतीदरम्यान आपल्या कठीण परिस्थिंतीची आठवण काढत सांगितले होते की, एका निर्देशकाने त्याला दगा दिला होता या बद्दल वरुण म्हणाला की, “मी एक चित्रपट साइन केला होता, ज्यासाठी मला हिरोच्या मित्राची भूमिका मिळाली होती पण याच्यासाठी माझं ऑडिशनही घेतलं नव्हतं. जेव्हा मी त्यांच्याकडे बोलण्यासठी गेलो तेव्हा त्यांनी माझ्याकडून कॉन्ट्रॅक्टवर सही करुन घेतली. त्या कॉन्ट्रॅक्टच्या पेपरवर फक्त चार ओळ लिहिलेल्या होत्या. तेव्हा मी विचारलं की हा कसला कॉन्ट्रॅक्ट आहे? कॉन्ट्रॅक्टचा अर्थ म्हणजे एक पुर्ण पुस्तक असतं, ज्यामध्ये खूपसारे पाने असतात. मात्र, तो फक्त चार ओळींचा कॉन्ट्रॅक्ट होता. मी देखिल काहीच विचार न करता सही केली कारण त्यावेळी मला फार काही गोष्टी माहित नव्हत्या. यानंतर त्यांनी रेल्वेनी आम्हाला सेटवर पाठवले.”
View this post on Instagram
वरुणने पुढे सांगितले, “जेव्हा मी शुटींगच्या सेटवर पोहोचलो तेव्हा मला समजले की, मी हिरोचा भाव नाही तर साइड आर्टिस्ट आहे. पण दिग्दर्शकाने याबद्दल मला काहीच सांगितलं नव्हतं. यनांतर जेव्हा शुटिंग सुरु व्हायची तेव्हा पुढे सगळं शुट व्हायचं आणि मी मागे चालत राहायचो, पण मला वाटलं ठीक आहे एकप्रकारचं अनुभव घेऊयात.आणि मग एक दिवस जेवन आलं तेव्हा त्यांनी आम्हाला कलरच्या डब्ब्यात जेवण दिलं ज्यावर कलरच्या ब्रॅंडचं नाव लिहिलं होतं आणि त्याच्या आतमध्ये जेवण होतं. त्यावेळी तिथे उपस्थितीत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांना पाहून माझ्या देखिल डोळ्यात पाणी आलं होतं.”
वरुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्याने अनेक चित्रपटामध्ये काम करुन आपलं मोठं स्थान निर्माण केलं आहे. सध्या वरुण शर्मा बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. अभिनयासोबतच वरुण अवॉर्ड शोमध्ये सुत्रसंचालनही करत असतो. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित रितेश देशमुख आणि वरुण शर्मा हे दोघे मिळून ‘केस तो बनता है‘ या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करतात. यामध्ये आजपर्यत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती, त्याशिवया अनेक भागही खूप प्रसिद्ध होतात. सोशल मीडियावरही या कार्यक्रमाचे व्हिडिओ क्लीप व्हायरल होत असतात. त्यामध्ये वरुणच्या कॉमेडीचे आणि सुत्रसंचानेचेही खुप कौतुक होत असते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नावर कंगना रनौतची प्रतिक्रिया; म्हणाली, ‘इंडस्ट्रीमध्ये कदाचितच खरं प्रेम…
सिद्धार्थ मल्होत्राला बळजबरी कियारा अडवाणीला करावा लागलं होतं किस, वाचा तो रंजक किस्सा