मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का! अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनामुळे निधन, सुशांतच्या ‘छिछोरे’ चित्रपटात केले होते काम

Movie Chhichhore Actress Abhilasha Patil Dies Post Battling Covid-19


सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट पसरलं आहे. यादरम्यान चित्रपटसृष्टीचंही मोठं नुकसान झाले आहे. कोरोना व्हायरसमुळे सामान्य व्यक्तींव्यतिरिक्त कलाकारांनाही आपल्या तावडीत घेतले आहे. अनेक दिग्गज कलाकारांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच आता चित्रपटसृष्टीतून दु:खद बातमी समोर येत आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या ‘छिछोरे’सह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेली मराठमोळी अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. मंगळवारी (४ मे) त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्या ४७ वर्षांच्या होत्या.

हाती आलेल्या वृत्तानुसार, अभिलाषा बनारस म्हणजेच वाराणसी येथे शूटिंंगसाठी गेल्या होत्या. परंतु त्या जेव्हा मुंबईला परतल्या, तेव्हा त्यांच्यात कोरोना व्हायरसची लक्षणे आढळली. यामुळे त्यांनी आपली कोरोनाची चाचणी केली, तेव्हा त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्या मागील काही दिवसांपासून आयसीयूमध्ये दाखल होत्या. अभिलाषा हे मराठी चित्रपटसृष्टीतील खूप मोठं नाव होतं.

त्यांनी ‘ते आठ दिवस’, ‘बायको देता का बायको’, ‘तू तिथे असावे’, ‘प्रवास’ आणि ‘तुझा माझा अरेंज मॅरेज’ यांसारख्या मराठी चित्रपटात काम केले होते. याव्यतिरिक्त त्यांनी ‘छिछोरे’सह ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘गुड न्यूज’ आणि ‘मलाल’ यांसारख्या हिंदी चित्रपटात काम केले होते. अभिलाषा यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक मराठी कलाकार त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.

मराठी अभिनेता अतुल तोडणकर यांनी फेसबुकवर ‘अभिलाषा नाही यार’ असे लिहित रडणारे इमोजी पोस्ट केले आहेत.

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने भारतात थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे नुकतेच निक्की तांबोळीचा २९ वर्षीय भावाचाही मृत्यू झाला होता. दुसरीकडे अभिनेत्री भूमी पेडणेकरनेही आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ज्या गायिकेच्या गाण्यांना यूट्यूबवर १ बिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळालेत, तिला कपडे धुताना पाहिलंय का? एकदा पाहाच

-बंगाल हिंसेवर ‘धाकड गर्ल’ कंगना रणौतने रडत रडत दु: ख केले व्यक्त, सरकारकडे केली राष्ट्रपती राजवटीची मागणी

-एकदम कडक! युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने चाहत्यांना शिकवला ‘सपने में मिलती है’ गाण्यावर डान्स, थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.