‘फुकरे’ चित्रपटाला ८ वर्षे पूर्ण; अभिनेत्री रिचा चड्ढा रमली जुन्या आठवणीत; म्हणाली, ‘याच सिनेमामुळे मिळाला जोडीदार’


दरवर्षी हिंदी सिनेसृष्टीमध्ये १००० पेक्षा अधिक सिनेमे प्रदर्शित होतात. यापैकी काही सिनेमे हिट होतात, तर काही फ्लॉप. मात्र, या पलीकडे जाऊन काही सिनेमे कायमस्वरूपी प्रेक्षकांच्या मनात कोरले जातात. असाच एक सिनेमा म्हणजे ‘फुकरे.’ रिचा चड्ढा, पुलकित सम्राट, अली फजल, वरुण शर्मा आदी कलाकारांच्या भूमिका असलेला हा सिनेमा खूप गाजला. या सिनेमाची कथा, कलाकार सर्वानीच प्रेक्षकांवर मोहिनी घातली.

सोमवारी (१४ जून) या सिनेमाला प्रदर्शित होऊन ८ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने अभिनेत्री रिचा चड्ढाने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. रिचाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून सोबत एक स्टोरी देखील पोस्ट केली आहे. रिचाने तिच्या स्टोरीमध्ये लिहिले की, “फुकरे सिनेमाच्या निमित्तानेच मला माझा जोडीदार मिळाला. आम्ही सर्व कलाकारांनी मिळून ‘फुकरे रिटर्न्स’मध्ये देखील सोबत काम केले. आता पुन्हा आम्ही ‘फुकरे ३’मध्ये आम्ही सोबत दिसणार आहोत.”

Photo Courtesy: Instagram/therichachadha

रिचाने तिच्या या सिनेमाशी संबंधित अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रिचाने सांगितले की, या चित्रपटांच्या शूटिंग दरम्यान हे सर्व कलाकार चांगले मित्र बनले होते. ‘फुकरे ३’ चित्रपटाची शूटिंग सुरु झाली असून, कलाकारांनी त्या सिनेमाच्या मुहूर्ताचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ‘फुकरे’ सिनेमा दरम्यान मैत्री झाल्यानंतर ‘फुकरे रिटर्न’ चित्रपटादरम्यान रिचा आणि अली हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. रिचा आणि अली हे दोघं एक यशस्वी अभिनेते असण्यासोबतच यशस्वी निर्माते देखील आहेत.

रिचा आणि अली लवकरच लग्न करणार आहेत. हे दोघे आधीच लग्न करणार होते. मात्र, कोरोनामुळे या दोघांचे लग्न टळले. कोरोना कमी झाल्यानंतर लवकरच हे दोघे लग्न करणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारने चित्रपटाची फी कमी केली?? पसरलेल्या या बातम्यांना अभिनेत्याने ‘अशाप्रकारे’ दिले सडेतोड उत्तर

-सुशांतच्या आठवणीत रिया चक्रवर्ती झाली भावुक; म्हणाली, ‘तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही…’

-‘हे मॉं, माताजी!,’ दयाबेनचा बोल्ड अवतार पाहून चाहते झाले हैराण; बॅकलेस ब्लाऊजमध्ये केला धमाकेदार डान्स


Leave A Reply

Your email address will not be published.