मनोरंजनविश्वातील प्रतिभावान विनोदवीर आणि उत्तम अभिनेता असलेला वीरदास आज ३१ मे रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. टीव्ही मालिकांसोबतच चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेला वीरदास त्याच्या अभिनयापेक्षा अधिक स्टॅन्डअप कॉमेडीमुळे ओळखला जातो. वीरदास त्याच्या विविध वादांमुळे देखील ओळखला जातो. स्टँडअप कॉमेडीमुळे वीरदासला अनेकदा वादांचा सामना देखील करावा लागला होता. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या एकूण संपत्तीबद्दल. कॉमेडी शोसोबतच वीरदास चित्रपट, मालिका आणि इतर कामांमधून चांगली कमाई करतो. चला तर पाहूया त्याचे एकूण नेटवर्थ.
वीरदासचा जन्म ३१ मे १९७९ रोजी झाला. त्याने त्याच्या स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून त्याने देशातच नव्हे तर विदेशातही प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. त्याच्या शोला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणारी लोकप्रियता पाहून त्याचे खास शो देखील ठेवले जातात. कॉमेडीयांसोबतच एक अभिनेता असलेल्या वीरदासने ‘गो गोवा गॉन’, ‘बदमाश कंपनी’, कंगना रणौतसोबत ‘रिवॉल्वर राणी’, ‘डेली बेली’ आदी हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. वीरदास त्याच्या आलिशान लाईफस्टाईलमुळे देखील ओळखला जातो.
कॉमेडीयन वीरदासची कमाई बहुतकरून कॉमेडी शोजमधून आणि चित्रपटांमधून होते. यासोबतच तो यूट्यूब, ब्रांड एंडोर्समेंट, टीव्ही होस्ट आणि टीव्ही जाहिरातींमधून देखील बक्कळ पैसा कमावतो. एका माहितीनुसार वीरदास प्रत्येक महिन्याला १० ते १५ लाख रुपये कमावतो. त्याची १० कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. मात्र खुद्द वीरदासने कधीच त्याच्या संपत्तीबद्दल काही खुलासा केला नाही. वीरदासचे मुंबईमध्ये आलिशान घर असून, अनेकदा तो त्याच्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. यासोबतच त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्या असून, तो एका BMW गाडीचा मालक आहे. वीरदासने आतापर्यंत ३५ नाटकं, १०० पेक्षा जास्त कॉमेडी शो, १८ चित्रपट, ८ टीव्ही शो, ६ कॉमेडी स्पेशल शोमध्ये काम केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘प्रत्येक दिवस मधुचंद्रासारखा आहे’, वैवाहिक जीवनाबद्दल काय बोलली दलजीत कौर? एकदा वाचाच
सुंबुलवर काेसळला दु:खाचा डाेंगर; अभिनेत्री हंबरडा फाेडत म्हणाली, ‘तू नेहमी माझ्या हृदयात राहशील’