नुकतंच कलाविश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे तेलुगू इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेता चलपति राव यांचे निधन झाले आहे. त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांनी राहत्याघरीच अखेरचा श्वास घेतला. तलपति हे 78 वर्षाचे होते. त्यांनी अनेक चित्रपाटांंध्ये खलनायकाच्या भूमिका निभावल्या होत्या. त्यांच्या अशा अचानक निधनाने कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
साउथ चित्रपटामधील दिग्गज अभिनेता चलपति राव calpathi Rao) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपसून ते अभिनय क्षेत्रापासून लांब झाले होते. इंडस्ट्रीमध्ये त्यांना कॉमेडी आणि खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखले जायचे. चलपति यांनी एकूण 600 चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी साऊथच नाही, तर बॉलिवूडमधील ‘किक’ चित्रपटामध्ये अभिनेता सलमान खान ( Salman Khan) याच्यासोबतही काम केले होते.
आंध्र प्रदेशचे राहणारे चलपति यांच्या निधनाच्या बातमीने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या चाहत्यांना निधनाची बातमी समजल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चित्रपटापासून ते राजकारणापर्यंतचा प्रवास करणारी ‘नगमा’, सलमान खानसोबत केले होते बॉलिवूड पदार्पण, आज आहे करोडोंची मालकीण
वयाच्या 16 व्या वर्षी नगमाने केला सलमानसोबत डेब्यू; लोकप्रियता इतकी की, चाहत्यांनी बांधले होते मंदिर










