Wednesday, December 6, 2023

चित्रपटापासून ते राजकारणापर्यंतचा प्रवास करणारी ‘नगमा’, सलमान खानसोबत केले होते बॉलिवूड पदार्पण, आज आहे करोडोंची मालकीण

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येकालाच यश किंवा लोकप्रियता मिळत नाही. मोजक्या कलाकारांनाच ती कसब उत्तमरीत्या जमते. काही कलाकार चित्रपटसृष्टीत कधी येतात आणि कधी जातात ते सुद्धा कळत नाही. काहींना सुरुवातीच्या काळात यश मिळते, तर नंतर मात्र ते अपयशी ठरतात. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे ‘नगमा’.

प्रसिद्ध दिवंगत व्यापारी अरविंद मोरारजी यांची कन्या नगमा अर्थातच नंदिता अरविंद मोरारजी. ती नव्वदच्या दशकात गाजलेली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 25 डिसेंबर, 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. एक भारतीय राजकारणी तथा प्रसिद्ध अभिनेत्री अशी तिची ओळख. तिची आई मुस्लिम, तर वडील हिंदू होते. तिला रोशनी आणि राधिका अशा दोन बहिणी आहेत.

वयाच्या सोळाव्या वर्षी तिने सन 1990मध्ये ‘बागी’ चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. हा चित्रपट हिट होताच ती रातोरात स्टार बनली. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सलमान खान देखील होता. सोबतच तिने ‘बेवफा से वफा’, ‘दिलवाले कभी हार न माने’, ‘किंग अंकल’, ‘हस्ती’, ‘धरतीपुत्र’, ‘सुहाग’, ‘कौन रोकेगा मुझे’, ‘लाल बादशाह’, ‘कुवारा’ आणि ‘चल मेरे भाई’सारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. काही चित्रपट तिचे यशस्वी ठरले. पण काही चित्रपटात पाहिजे तसे यश ती मिळवू शकली नसल्याने तिच्या कारकिर्दीची गाडी बॉलिवूडच्या रुळावर जास्त काळ टिकली नाही. आपल्या कारकिर्दीत तिने पन्नासहून अधिक चित्रपटात काम केले आहे.

आपल्या हिंदी चित्रपटाच्या सुरुवातीच्या यशानंतर ती आपली मैत्रीण दिव्या भारती हिच्या सांगण्यानुसार तेलुगु चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी दक्षिण भारतात गेली. तिकडे सुद्धा तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाची झलक दाखवून लाखो चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. तमिळ आणि तेलुगु सोबतच ती भोजपुरी, मल्याळम आणि कन्नड चित्रपटसृष्टीत देखील झळकली. भोजपुरी चित्रपटातील माधुरी दीक्षित म्हणून ती नावारूपास आली.

सन 2005 च्या ‘दुल्हा मिलल दिलदार’ या चित्रपटातील अभिनयासाठी नगमा हिला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ हा पुरस्कार मिळाला होता, तर 2006 मध्ये ‘गंगा’ या चित्रपटात ती अभिनेत्री हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसली होती.

सन 2006 मध्ये राज बब्बर यांच्यासोबत ‘एक जिंद एक जान’ हा पहिला पंजाबी चित्रपट केला. तिच्या मालमत्तेविषयी बोलायचं झालं, तर 10 दशलक्षाहून अधिक संपत्ती तिच्या नावावर आहे. सोबतच आलिशान घर आणि मोठमोठ्या गाड्या देखील तिच्याकडे असून ती एक राजेशाही जीवन जगत आहे.

नगमाचे खासगी आयुष्य ही बरेच चर्चेत राहिले. इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना तिचे नाव अनेकांशी जोडले गेले होते. विशेषतः भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुलीसोबत. दोघांच्या प्रेमप्रकरणाबद्दल सर्रास चर्चा व्हायच्या. परंतु काही कारणास्तव या चर्चांना पूर्णविराम लागला होता. या व्यतिरिक्त भोजपुरी अभिनेता रवी किशनसह नगमाचे नाव जोडले गेले होते. अफेअरमुळे चर्चेत राहिलेली नगमा खऱ्या आयुष्यात मात्र अविवाहित आहे.

बॉलिवूड बरोबरच अनेक दाक्षिणात्य आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करणारी नगमा सध्या अभिनयापासून दूर राजकारणात सक्रिय आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत नगमाने मेरठ हापुर लोकसभा मतदारसंघाकडून काँग्रेस उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. (april 2021 some interesting facts about nagma who is work with salman khan and now became the politician)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
गळफास घेऊन आत्म’हत्या करणाऱ्या अभिनेत्रीचा अखेरचा व्हिडिओ व्हायरल, करत होती ‘हे’ कृत्य

एकेकाळी ‘रिक्षा चालवणारा’ कसा बनला कॉमेडीचा किंग, वाचा हा खडतर प्रवास

हे देखील वाचा