Sunday, June 23, 2024

बॉलीवूडला झटका! ‘या’ दिग्गज आणि प्रतिभावान अभिनेत्रीचे दुःखद निधन

मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध आणि जेष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना बेला बोस यांचे दुःखद निधन झाले आहे. त्या ७९ वर्षांच्या होत्या. त्यांनी त्यांच्या करियरमध्ये २०० पेखा अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. बेला बोस या शास्त्रीय मणिपुरी नृत्यशैलींमध्ये प्रशिक्षित होत्या. त्यांनी ‘शिकार’, ‘जीने की राह’, ‘जय संतोषी मां’ आदी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.

नृत्य आणि अभिनय यासोबतच त्या उत्तम कवयित्री, उत्तम चित्रकार आणि राज्यस्तरीय जलतरणपटू देखील होत्या. अतिशय बोलक्या स्वभावामुळे त्या सर्वानाच आपलेसे करून घ्यायच्या. त्या युद्ध विधवा संघाच्या अध्यक्ष देखील होत्या. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी अभिनेते आणि निर्माता असीस कुमार यांच्याशी लग्न केले होते.

बेला बोस यांनी त्यांनी आयुष्यात मोठा संघर्ष केला. त्यांचा जन्म कलकत्त्यातील एका सधन कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचा कपड्याचा व्यवसाय होता. मात्र एका बँकेतील घोटाळ्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे दिवाळे निघाले. त्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब कोलकात्यावरून मुंबईला आले. त्यानंतर काहीच दिवसात बेला यांच्या वडिलांचे एका रस्ते अपघातात निधन झाले. वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. अभिनयासोबतच त्यांनी त्यांचे शिक्षण सुरु ठेवले. त्यांनी शाळेतच एक डान्स ग्रुप जॉईन केला आणि विविध ठिकाणी परफॉर्म करायला सुरुवात केली.

बेला बोस यांचा पहिला सिनेमा होता गुरुदत्त यांच्यासोबतचा ‘सौतेला भाई’. हा सिनेमा १९६२ साली प्रदर्शित झाला. चित्रपटांसोबतच त्यांनी अनेक बंगाली नाटकांमध्ये प्रभावी अभिनय केला आणि वाहवा मिळवली. अनेक मोठं मोठे कलाकार त्यांच्या अभिनयाबद्दल त्यांची स्तुती करायचे. बेला बोस यांच्या निधनामुळे मनोरंजनविश्वाचे मोठे नुकसान झाल्याचे भावना व्यक्त केली जात आहे. बेला बोस यांच्या कुटुंबात एक मुलगा, मुलगी आणि नातू आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमधील अभिनेता आयुष्मान खुराना झाला ‘युनिसेफ इंडिया’चा ब्रँड एम्बेसिडर
स्वराने ट्वीटमध्ये ‘भाऊ’ म्हटल्यानंतर होणाऱ्या ट्रोलिंगला फहादने दिले चाेख उत्तर; म्हणाला, ‘हिंदू-मुस्लिम भाऊ…’

हे देखील वाचा