Monday, July 15, 2024

दुख:द! केर्सी सोराबजी दारूवाला यांचे निधन, वयाच्या ६८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

निवृत्त व्यवस्थापकीय संचालक केर्सी सोराबजी दारूवाला (Kercy Sorabji Daruwala) यांचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (२२ जानेवारी) रात्री १० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या ६८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रविवारी (२३ जानेवारी) केर्सी सोराबजी यांचे पार्थिव टॉवर ऑफ सायलेन्स – केम्प्स कॉर्नर, डुंगरवाडी येथे सकाळी ९.३० वाजता आणण्यात आले. याठिकाणी त्यांच्या प्रियजनांनी त्यांना शेवटची भेट दिली. त्याचवेळी सकाळी १० वाजता त्यांना अंतिम निरोप देण्यात आला. केर्सी सोराबजी हे २०१५ पर्यंत एसपीई फिल्म्स इंडिया (सोनी) इंडियाचे प्रमुख होते.

त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर SPE फिल्म्स इंडियासोबत काम करण्याव्यतिरिक्त, केर्सी सोराबजी दारूवाला यांनी २०१५ मध्ये निवृत्तीनंतर, विविध मनोरंजन कंपन्यांमध्ये प्रभावी कॉर्पोरेट भूमिकाही बजावल्या.

हेही वाचा :

‘रणबीर कपूर म्हणत असेल, धन्यवाद देवा ब्रेकअप केला’, ‘गेहेराईयाचा’ ट्रेलर पाहून केआरकेने उडवली दीपिकाची खिल्ली

महाराष्ट्राची कन्या बनली हैदराबादची सून, नम्रता शिरोडकर आणि महेश बाबूची अनोखी लव्हस्टोरी | HBD Namrata Shirodkar

नोरा फतेही आणि टेरेन्स लुईसची सिझलिंग केमेस्ट्री, व्हिडिओने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

 

हे देखील वाचा