मराठी कलाक्षेत्राला हादरा देणारी बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तब्बल 60 वर्षांहून अधिक काळ त्यांनी त्यांच्या गायिकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. शनिवारी (10 डिसेंबर) रोजी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.
ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांची प्रकृती गेली काही दिवसांपासून खालावली होती. उतारवयामुळे आलेले आजारपण आणि काही शस्त्रक्रिया यामुळे सुलोचना चव्हाण यांची प्रकृती नाजूक बनली होती. अशात शनिवार (10 डिसेंबर) रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुलोचना चव्हाण यांनी लावणी क्षेत्रात गायनाच्या माध्यमातून स्वतः अढळ स्थाम निर्माण केले. त्यांच्या आवाजातून लावणी ही घराघरात पोहचली. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. ‘रंगल्या रात्री’ या चित्रपटासाठी त्यांनी पहिली लावणी गायली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करादैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘मला चार मुले झाली ती फक्त काँग्रेसमुळे….’, अभिनेते आणि खासदार रवी किशन यांचे खळबळजनक विधान
धक्कादायक! दिग्गज अभिनेत्री वीणा कपूर यांची हत्या, आरोपीच्या पिंजऱ्यात पोटचा मुलगा
ही बातमी सतत अडेट होत आहे-