Thursday, April 18, 2024

धक्कादायक! दिग्गज अभिनेत्री वीणा कपूर यांची हत्या, आरोपीच्या पिंजऱ्यात पोटचा मुलगा

अभिनय क्षेत्रामधून नुकतंच धक्कादायक घटना घडल्याचे समोर येत आहे. एक दिवसापूर्वी मुंबईच्या जुहू बीचवर एक मृतदेह सापडला होता, याचा व्हिडिओ देखिल सोशल मीडिवर तुफान व्हायरल झाला मात्र, माहितीनुसार समोर आले आहे की, ही व्यक्ती दुसरी तिसरी नसून अभिनय क्षेत्रामधील दिग्गद अभिनेत्री वीणा कपूर यांची आहे. 74 वर्षीय अभिनेत्रीची हत्या करुन त्यांचा देह जुहू बीचवर सापडल्याच्या बातमीने मुंबई शहराला हादरा बसला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, वीणा यांच्या हत्याप्रकरणी त्यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

अभिनेत्री वीना कपूर (Veena Kapoor) यांच्या हत्येने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबई शहराला मोठा धक्काच बसला आहे. मात्र, अजून एक धक्का पोहोचवणारी गोष्ट म्हणजे त्यांच्याच मुलानी फक्त संपत्तीसाठी आपल्या आईची हत्या करुन निर्दयी मनाने तिचा देह नदीमध्ये फेकून दिला. या घटमुळे कलाविश्वात शोककळेसोबतच भितीचे वातावरण पसरले आहे. वीणाजींनी अनेक चित्रपाटमध्ये काम केले होते, त्याशिवाय त्यांनी टेलिव्हिजन क्षेत्रामध्येही आपल्या अभिनयाने छाप सोडली होती.

झाले असे की, विरल भयानी (Viral Bhayani) याच्या सोशल मीडिया पेजवर एका महिलाच्या फोटोसोबत माहिती लिहिली होती की, “एका महिलेला संपत्तीसाठी तिच्या पोटच्या पोराने तिची हत्या करुन तिचा देह नदीमध्ये फेकूण दिला आहे.” या व्हिडिओला पाहून नीलू कोहली (Nilu Kohali) हिने या पोस्टला रिपोस्ट करत दिग्गज अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहत एक भावनिक नोट लिहिले. तिने शेअर केल्या पोस्टवर अन्य कलाकारांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

नीलूने पोस्ट शेअर करत लिहिले होते की, “वीणा जी तुमची यापेक्षा चांगली पात्रता होती, माझे हृदय तुटले आहे, तुमच्यासाठी हे लिहित आहे, काय सांगू, आज मी नि:शब्द आहे, इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर मला आशा आहे की, तुम्हाला शांतता मिळेल.”

दिग्गज अभिनेत्री वीणा कपूर यांना दोन मुले आहेत, त्यापैकी एक यूएसएमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि दुसऱ्या मुलाचे नाव सचिन आहे. माध्यमातील वृत्तानुसार सचिनला अभिनेत्रीच्या मृत्यूप्रकरणी अटक केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘इंडियन आयडल’च्या मंचावर हेमा मालिनी यांनी बोलता बोलता सांगितला ‘हा’ गुपित किस्सा
‘आता ती वेळ आली आहे…’ म्हणत विद्युत जामवालने लैंगिक समस्यांसाठी सांगितले तब्बल 19 व्यायाम प्रकार

हे देखील वाचा