‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक दु:खत बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचे आज, शनिवारी निधन झाले. देव यांनी वयाच्या 82व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘मैंने प्यार किया’, ‘बाजीगर‘, ‘जुडवा 2’, ‘मुसाफिर’, ‘टॅक्सी नंबर 911’ यांसारख्या 100 हून अधिक हिट चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत.
देव ( Dev Kohli ) यांनी अनु मलिक, राम लक्ष्मण, आनंद राज अनाद, आनंद मिलिंद आणि इतर अनेक संगीत दिग्दर्शकांसोबत अनेक हिट चित्रपटांसाठी काम केले आहे. त्यांनी सलमान खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘मैने प्यार किया’ मधील ‘आजा शाम होने आयी’ सारखी काही उत्तम गाणी लिहिली आहेत.
पाकिस्तानातील रावळपिंडी येथे जन्मलेल्या देव कोहलीचे बालपण डेहराडूनमध्ये गेले. त्यानंतर 1949मध्ये ते दिल्ली आले होते. 1964 मध्ये देव कोहली मुंबईत राहत होते. देव कोहलीच्या निधनाची माहिती त्यांचे प्रवक्ते प्रीतम शर्मा यांनी दिली. त्यांच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमीत सायंकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांनी सांगितले की, “देव कोहली गेल्या काही महिन्यांपासून कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने शनिवारी 26 ऑगस्ट रोजी पहाटे झोपेतच त्यांचे निधन झाले.” असे ‘इंडियन एक्सप्रेस’ने वृत्त दिले आहे. देव कोहलीच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये 100 हून अधिक गाणी लिहिली आहेत.
‘ये काली काली आंखे’, ‘मै ने मै मुंदर पे तेरी’ आणि ‘ओ साकी साकी’ या सारखी ब्लॉकबस्टर गाणी देव कोहलीनी लिहिली आहेत. कंगना राणौतचा ‘रज्जो’ या चित्रपटातील गाणं देखील त्यांनी लिहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडला एकवर एक धक्के बसत आहेत. गेल्या काही दिवसांत तीन-चार सेलिब्रिटींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अभिनेत्री सीमा देव, चित्रपट एडिटर संजय वर्मा, गायक राजू , पंजाबी आणि मराठी अभिनेता मिलिंद सफाई यांच्या नावाचा समावेश आहे.(Veteran lyricist Dev Kohli of ‘Maine Pyaar Kiya’ fame passed away)
अधिक वाचा-
–कामाचे पैसे न मिळाल्याने संतापली गौतमी; थेट स्क्रिनशॉट शेअर करत म्हणाली, ‘स्वत:च्या पैशांसाठी…’
–एकेकाळी अभिनयात सलमानला द्यायचा टक्कर; एका घटनेने संपवून टाकले इंदरचे करिअर