मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मृण्मयी देशपांडे हिची बहिण गौतमी देशपांडे सतत चर्चेत असते. गौतमी सोशल मीडियावर सतत काही ना काही शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहून चाहचे तिच्या पोस्टर प्रेमाचा वर्षाव करत असतात. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. गौतमीने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे तिला कोणी ओळखत नाही असे नाही. गौतमीने नुकतीच एक पोस्टम शेअर केली आहे. जी सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे.
गौतमीने (gutami deshpande) एक स्क्रिनशाॅट शेअर केला आहे. काम केलेल्याचा मोबदला न मिळाल्यामुळे गौतमीने संतप्त व्यक्त केला आहे. शेअर केलेल्या स्क्रिनशाॅटवर लिलिले आहे की, “हॅलो! ‘पैसे ट्रान्सफर केले का?’” यानंतर अभिनेत्रीला “थांबा, चेक करते” असा रिप्लाय आलेला दिसत आहे. पण दोन दिवस उलटून गेली तरी तिला पैसे भेटलेले नाहीत. त्यामुळे गौतमीने पुन्हा फोन केले आहे. तेव्हा तिने मेसेज केला की, “मी तुम्हाला संपर्क करण्याचा खूप वेळा प्रयत्न केला. एखाद्या कलाकाराला एखाद्या गोष्टीसाठी एवढ्या वेळा पाठपुरावा करावा लागतो हे खरोखरचं वाईट आहे. तुम्ही सोमवारपर्यंत माझे पैसे मला ट्रान्सफर करा.”
तसेच पुढे तिने लिहिले की, “तुम्ही उत्तर पण देऊ शकत नाही का? जर, मला उत्तर देण्याचं सौजन्य तुमच्यामध्ये नसेल तर हा घडलेली सगळी घटणा मी इन्स्टाग्रामवर शेअर करणार आहे.” असा इशारा तिने दिला आहे. इतरचं नाही तर तिने तो स्क्रिनशाॅट शेअर देखील केला आहे.
पोस्ट शेअर करताना तिने लिहिले की, “जेव्हा पैशांचा प्रश्न येतो…तेव्हा लोक असं वागतात. मला या क्षणी खरच राग पण येतो आणि वाईट पण वाटतंय. आपण केलेल्या कामाचा मोबदला आपल्याला असा मिळतो. इतकचं नाही तर स्वत:च्या पैशांसाठी पाठपुरावा करावा लागतो.” यावेळी तिने कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. (Gautami Deshpande, who was angry about not getting the money for the work, shared the information on Instagram)
अधिक वाचा-
–एकेकाळी अभिनयात सलमानला द्यायचा टक्कर; एका घटनेने संपवून टाकले इंदरचे करिअर
–ऋतिकला सुपरहिट करणाऱ्या दिग्गज व्यक्तीचे निधन; एक दिवसाआधीच चित्रपटाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार