Wednesday, March 29, 2023

पाकिस्तानमधील दिग्गज अभिनेते जिया मोहिउद्दीन यांचे दुःखद निधन

पाकिस्तानी सिनेसृष्टीसाठी आज एक वाईट घटना घडली आहे. हॉलिवूडमध्ये काम करणारे पहिले पाकिस्तानी अभिनेते जिया मोहिउद्दीन यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते एका मोठ्या आजाराशी मागील बराच काळ लढत होते अखेर आज १३ फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले. पोटदुखी आणि तापामुळे त्यांना कराची येथील एका रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार चालू होते, मात्र ते योग्य प्रतिसाद देत नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

जिया मोहिउद्दीन यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ६.३० वाजता अखेरचा श्वास घेतला. जिया मोहिउद्दीन यांच्यावर कराची येथील डिफेन्स भागात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. जिया मोहिउद्दीन यांचा जन्म १९३१ साली पाकिस्तानच्या पंजाब प्रांतमधील फैसलाबादमध्ये झाला. जिया मोहिउद्दीन यांनी अभिनयासोबतच ब्रॉडकास्टिंग आणि कविता पठणमध्ये देखील नाव कमावले. ते जवळपास ६७ वर्ष रंगभूमी आणि चित्रपटांशी जोडलेले होते.

जिया मोहिउद्दीन हे कराची येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्टच्या प्रेसिडेंट एमिरेट्स पदी देखील विराजमान झाले होते. त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये कॉलम लेखन देखील केले होते. जिया मोहिउद्दीन यांनी पाकिस्तानी चित्रपट आणि मालिकांव्यतिरिक्त ब्रिटिश सिनेमा आणि टेलिव्हिजनमध्ये देखील नाव कमावले. ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ (1962), ‘बीहोल्ड द पेल होर्सिन’ (1964), ‘इमैक्युलेट कंसेप्शन’ (1992) आदी त्यांच्या लोकप्रिय कलाकृती आहेत. जिया मोहिउद्दीन हे अशा मोजक्या पाकिस्तानी कलाकारांमध्ये गणले जातात, ज्यांनी पाकिस्तानबाहेर जाऊन हॉलिवूडमध्ये नाव कमावले होते. त्यानी ‘ए कैरट इज ए कैरट’, ‘थियेट्रिक्स’ आणि ‘द गॉड ऑफ आइडल ट्री मेमोरीज एंड रिफ्लेक्शंस’ ही तीन पुस्तकं देखील लिहिली होती.

जिया मोहिउद्दीन यांच्या निधनामुळे पाकिस्तानी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून, पाकिस्तानचे पंतप्रधान असलेल्या शहबाज शरीफ यांनी देखील त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. जिया मोहिउद्दीन यांना त्यांच्या योगदानासाठी अनेक उत्तम आणि मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांना २०१२ साली पाकिस्तानचा दुसरा मोठा नागरिक सम्मान हिलाल-ए-इम्तियाजने गौरवले गेले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट ‘या’ तारखेला हाेणार प्रदर्शित

राजकुमार हिरानी बनवणार लाला अमरनाथांचा बायाेपिक, ‘खिलाडी’ अक्षय दिसणार मुख्य भूमिकेत?

हे देखील वाचा