Monday, July 1, 2024

लतादिदी काळाच्या पडद्याआड; कलाकारांना अश्रू अनावर! सिनेक्षेत्रातून श्रद्धांजलीचा महापूर, वाचा सर्वांच्या प्रतिक्रिया

संपूर्ण भारतवासीयांच्या काळजाचा ठोका चुकणारी बातमी समोर आली आहे. गेली अनेक दशके आपल्या स्वर्गीय आवाजाने कोट्यवधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या महान गायिका भारतरत्न (Bharat Ratna) लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ९२व्या वर्षी लतादिदींनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

लता मंगेशकर (Singer Lata Mangeshkar) यांच्या जाण्याने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. त्यातही कलाविश्वाची कधीही भरुन न येणारी हानी झाली आहे. मागील अनेक दशकांपासून लतादिदींनी बॉलिवूड (Bolywood) मराठी (Marathi) यांसह इतर अनेक सिनेसृष्टीमध्ये हजोरोंच्या संख्येने गाणी गायिली. त्यांच्या गोड सर्वर्गीय आवाजामुळे आज अनेक गाणी, अनेक सिनेमे आणि त्या गीतांच्या अनुषंगाने काही कलाकारही अजरामर झालेत. (Bollywood News Lata Mangeshkar Passes Away)

गानसरस्वती लता मंगेशकर (Veteran Singer Lata Mangeshkar) यांच्या निधनाची बातमी प्रसिद्ध होताच कलाविश्वातून मोठ्या प्रमाणावर श्रद्धांजली अर्पण केल्याचे संदेश आणि शोकयुक्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच काही कलाकारांनी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत लतादिदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. (Lata Mangeshkar Passes Away At Mumbai)

गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनानंतर कलाविश्वातून शोकयुक्त प्रतिक्रियांचा ओघ…
(Lata Mangeshkar Death, Reactions From Bollywood Marathi Film Industry)

१. बॉलिवूडमधून श्रद्धांजलीचा महापूर…

२. मराठी कलाकारांना अश्रू अनावर…

तब्बल महिन्याभरापासून सुरु होते उपचार…

दिनांक ८ जानेवारी रोजी लता मंगेशकर (Veteran Singer Lata Mangeshkar) यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालय (Breach Candy Hospital) येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून लतादीदींवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान काही दिवसांनंतर त्या कोरोनातून (Corona) बऱ्या झाल्या होत्या. (Lata Mangeshkar Cororna Positive) तसेच, त्यांची तब्येतही सुधारल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली होती. परंतू, कोरोनासह त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली होती, ज्यावर उपचार सुरु होते. अन् त्यामुळेच त्यांची तब्येत पुन्हा बिघडली.

दिदींची तब्येत अचानक खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना शुक्रवारी (५ फेब्रुवारी) आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर (कृत्रिम श्वसन यंत्रणा – Ventilator) ठेवले. ‘लतादिदींची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत’, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टरांनी दिली होती. मात्र, अखेरीस उपचारादरम्यान ९२ वर्षीय भारतरत्न (Bharat Ratna) लता मंगेशकर यांची प्राणज्योत मालवली. (Veteran Singer Bharat Ratna Lata Mangeshkar Passes Away)

हेही वाचा – भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदींना अश्रू अनावर; म्हणाले, ‘दिदी तुम्ही…’

लता मंगेशकर यांचा जीवनप्रवास…

मास्टर दिनानाथ मंगेशकर आणि शेवंती मंगेशकर या दांपत्याच्या घरात इंदौर येथे दिनांक २८ सप्टेंबर १९२९ रोजी लता मंगेशकर यांचा जन्म झाला. अगदी लहान वयापासूनच लतादिदींनी गायकीला सुरुवात केली. पुढे अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमातून आणि नंतर बॉलिवूड, मराठी या सिनेक्षेत्रासह अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या गोड आवाजाने कोट्यवधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

अनेक दशके त्यांनी आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मने जिंकली नव्हे तर त्यांच्या मनावर राज्य केले. लता मंगेशकर यांनी त्यांच्या जीवनात हजारो गाणी गायली, ज्यातील काही गाणी लतादिदींप्रमाणेच अजरामर आहेत. लतादिदींनी अगदी लहानपणापासूनच संगीत हेच आपले आयुष्य बनवले. संगीत, जे कधी आपल्याला हसवते तर कधी आपल्या डोळ्यातून अश्रु आणते. अशा दोन्ही आवाजांची देणगी लता मंगेशकर यांना लाभली होती.

अधिक वाचा –

…म्हणून दिलीप कुमार अन् लता दीदींमध्ये झाले मतभेद, तब्बल ‘इतकी’ वर्षे होता नात्यात अबोला

‘त्या’ व्यक्तीमुळे लता दीदी आयुष्यभर राहिल्या अविवाहित, ‘अशी’ आहे त्यांची अपुरी प्रेमकहाणी

जेव्हा राज कपूर यांनी लता मंगेशकरांना म्हटलं होतं, ‘कुरूप’ मुलगी; मग ‘गानकोकिळे’नंही घेतला होता मोठा निर्णय

हे देखील वाचा