Monday, February 26, 2024

सुशांत आणि अंकिताच्या नात्यावर विकी जैनची प्रतिक्रिया,म्हणाला,’त्यामुळे मी असुरक्षित वाटुन…’

नुकताच बिगबाॅस 17चा महाअंतिम सोहळा पार पडला. जरी बिगबाॅस 17 संपलं असलं तरीही त्याची चर्चा मात्र अजूनही संपलेली नाही. ग्रँड फिनाले झाल्या झाल्याच त्यातील कंटेस्टंट बाहेर आल्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतीत आणि शोमध्ये झालेल्या अनेक विषयांवर आता चर्चा रंगल्या आहेत. बिगबाॅस 17 मधीलंच एक जोडी म्हणजे विकी आणि अंकिता. विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांनी सोबतंच बिगबाॅसच्या घरात प्रवेश केला होता. दोघांनीही शोमधुन प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केलं.

या शोमध्ये(BigBoss 17) अनेकदा अंकिता तिचा एक्स सुशांत सिंगबद्दलही बोलताना दिसली. यादरम्यान असंही म्हणलं जात होतं की,फक्त सहानुभुतीसाठी अंकिता सुशांतचं नाव घेते, सुशांतच्या चाहत्यांनीही तिला सपोर्ट करावा इतकाच काय तो तिचा हेतु आहे. याविषयावर अनेक टिका करुनही अंकिताचा पती विकी जैनने आजपर्यंत याविषयावर मौनंच पाळले होते. त्याने कधी अंकितालाही सुशांतबद्दल(Sushant Singh Rajput) बोलण्यापासुन थांबवलं नाही. इतक्या दिवसांनी आता अंकिताने सुशांतचं नाव घेतल्या विषयी विकी जैनने त्याची प्रतिक्रिया मांडली आहे. विकी जैनने(Vicky Jain) एका वृत्तवाहिनीला दिलेल्या इंटरव्युमध्ये त्याच्या बिगबाॅसमधील प्रवासाबाबत सांगितले दरम्यान शोमध्ये त्याच्यामागे काय बोलणं व्हायचं यावरदेखील तो बोलला.

अंकिता-सुशांतच्या नात्यावर विकीची प्रतिक्रिया
रिलेशनशिपमध्ये कधी-कधी खुप गोष्टी घडतात. ज्यासाठी आपण तयार नसतो. त्यावेळी तुम्ही कसं एकमेकांना आधार देता त्यातुनंच नातं अधिक घट्ट होतं. मला माहिती आहे अंकिता आणि सुशांतचं नातं कसं होतं.मला त्यांच्याबाबतीत सगळं माहिती होतं. त्यांचं नातं खुप सकारात्मक होतं. परंतु मला यासगळ्या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही. मी खुप व्यावहारिक माणुस आहे.

अंकिताच्या भावना माहिती आहेत
विकी(Vicky Jain) पुढे असंही म्हणाला की,व्यावहारिक असणं फार गरजेचं आहे.या गोष्टी होतंच राहतात. मला माहिती आहे की अंंकिताच्या(Ankita Lokhande) मनात सुशांतसाठी काय भावना होत्या.परंतू त्यामुळे मी असुरक्षित वाटुन घेत नाही. शोमध्ये या जोडीत नेहमीच भांडणं चालु असायची यामुळे अनेकांनी असाही अंदाज लावला होता की शो संपल्यावर यांचा घटस्पोट होईल परंतु या चर्चेदरम्यान त्याने हेही स्पष्ट केलं आहे की,त्यांच्यात सर्वकाही ठीक आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

बिग बॉस जिंकल्यानंतर मुन्नवर फारुकीचा पहिला इंटरव्यू व्हायरल, ‘या’ खास व्यक्तीला ट्रॉफी केली समर्पित

#जोगबोलणार, जोगांनी BMC कर्मचाऱ्यांची मागितली माफी ,पुष्कर जोग म्हणाला,’ केवळ माणुसकी हाच धर्म…’

हे देखील वाचा