बॉलिवूड अभिनेता विकी कौशल या दिवसात कोरोनानंतर आता पुन्हा एकदा त्याच्या फिटनेसकडे वळला आहे. या वर्षी विकीला एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याला ठीक व्हायला खूप वेळ लागला होता. आता त्याची तब्बेत एकदम ठीक आहे आणि तो दररोज जिमला देखील जात आहे. विकी कौशलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने नवीन वैयक्तिक रेकॉर्ड सेट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो डेडलिफ्ट करताना दिसत आहे. (Vicky kaushal set his personal record, video get viral)
विकी कौशलने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “कोव्हिडनंतर होणाऱ्या रिकव्हरीनंतर डेडलिफ्टसोबत वैयक्तिक रेकॉर्ड बनवण्यासाठी आम्ही यशस्वी झालो आहोत. हो!! आज आम्ही पार्कमध्ये खुश होतो.”
या व्हिडिओला त्याने नेफेक्सचे फाईटबॅक गाणे लावले आहे. जे या व्हिडिओला साजेसे आहे. व्हिडिओ शेअर करून त्याने त्याच्या वैयक्तिक जिम ट्रेनरलाही टॅग केले आहे.
विकी कौशलच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच ‘द: इम्मोर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटात दिसणार आहे. या आधी तो ‘भूत- पार्ट एक : द हाँटेड शिप’ या चित्रपटात दिसला होता. त्याने नुकतेच काही दिवसांपूर्वी त्याच्या नवीन चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. तो लवकरच आपल्याला ‘फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ’ या चित्रपटातही दिसणार आहे.
विकी त्याच्या लव्ह लाईफमुळे देखील खूप चर्चेत आहे. त्याने अजून याबाबत कोणताच खुलासा केला नाही. मागील काही दिवसांपूर्वी तो त्याची गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ हिच्या घरी स्पॉट झाला होता. तसेच ते अनेकवेळा एकमेकांना भेटत असतात. परंतु त्यांनी सर्वांसमोर त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…