Wednesday, April 23, 2025
Home बॉलीवूड ‘गुप्त’ चित्रपटाला २४ वर्षे पूर्ण, खलनायिकेची भूमिका साकारून काजोलने सर्वांना हैराण करत पटकावला होता पुरस्कार

‘गुप्त’ चित्रपटाला २४ वर्षे पूर्ण, खलनायिकेची भूमिका साकारून काजोलने सर्वांना हैराण करत पटकावला होता पुरस्कार

‘गुप्त’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन रविवारी (४ जुलै) २४ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या चित्रपटातील गाणी आणि सस्पेन्स कहाणी सर्वांना खूप आवडली होती. हा चित्रपट 4 जुलै, 1997 रोजी प्रदर्शित झाला होता. ‘गुप्त’ हा चित्रपट बॉलिवूडमधील टॉप सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. (Gupt movie complete 24 years, kajol played a villian role in movie)

या चित्रपटात बॉबी देओलने साहिल हे पात्र निभावले होते. ज्याला ईशावर (काजोल) प्रेम होते. परंतु साहिलचे वडील त्यांच्या या नात्याच्या विरोधात असतात. त्यांना असे वाटत असते की, साहिलचे (बॉबी देओल) लग्न शीतल (मनीषा कोईराला) हिच्याशी व्हावे. या मध्येच बॉबी देओलच्या वडिलांची हत्या होते आणि बॉबी देओल तुरुंगात जातो. यानंतर चित्रपटात ट्विस्ट येतो. पण शेवटपर्यंत कोणीही याचा अंदाज लावू शकत नाही की, नक्की हत्या कोणी केली आहे?

‘गुप्त’ या चित्रपटात एक लव्ह ट्रँगल दाखवला होता. ज्यामध्ये शीतल आणि ईशा साहिलवर प्रेम करतात. त्या दोघींनाही त्याचे प्रेम मिळवायचे होते. या चित्रपटाच्या कहाणीसोबत गाणी देखील खूप गाजली होती. राजीव राय हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. त्यांनी ‘युद्ध’, ‘त्रिदेव’, ‘विश्वात्मा’ आणि ‘मोहरा’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.

या चित्रपटात काजोलने अशी भूमिका निभावली होती. जी तिने परत कधीच निभावली नाही. या चित्रपटातील तिची सुरुवातीची भूमिका खूप चांगली होती, पण नंतर एका टॉप स्टारला खलनायकाच्या भूमिकेत पाहून सगळेच हैराण झाले होते. शेवटी ती खुणी निघाली. तिला या खलनायकाच्या भूमिकेसाठी पुरस्कार देखील मिळाला होता. त्यावेळी खलनायकाच्या कॅटेगरीमध्ये काजोल ही एकमेव स्त्री होती. या चित्रपटात तिच्यासोबत बॉबी देओल, मनीषा कोईराला, राज बब्बर, परेश रावल, प्रेम चोप्रा, ओम पुरीसोबत अनेक कलाकारांनी दमदार अभिनय केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा