‘बॉलिवूडमध्ये कोणीही ड्रग्ज घेत नाही, सगळे पवित्र आहेत’; राखी सावंतच्या वक्तव्यावर ट्रोलर्सने साधला निशाणा


बॉलिवूडमधील ड्रामा क्वीन आणि बिग बॉस फेम अभिनेत्री राखी सावंत आजकाल सारखीच सोशल मीडियावर चर्चेत असते. अनेकवेळा राखी मुंबईच्या रस्त्यावर आणि कॉफी शॉपच्या बाहेर पॅपराजींसोबत स्पॉट होत असते. तिचे हे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात. राखी अनेकवेळा बॉलिवूड तसेच अनेक सामाजिक मुद्यावर तिचे मत मांडताना दिसली आहे. नुकतेच तिने बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाबाबत तिचे मत मांडले आहे. त्यामुळे ती खूप चर्चेत आली आहे. ( Rakhi Sawant’s bigg statement says no one takes drugs in bollywood)

राखी सावंत अनेकवेळा कॉफी शॉपच्या बाहेर, रस्त्यावर नाहीतर जिमच्या बाहेर स्पॉट होत असते. ती पॅपराजींना कधीच नाराज करत आहे. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे ती उत्तर देत असते. सध्या राखीचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्या व्हिडिओमध्ये तिला बॉलिवूडमधील ड्रग्जबाबत विचारतात. तेव्हा ती त्यावर उत्तर देताना दिसत आहे.

तिला प्रश्न विचारततात की, “राखीजी बॉलिवूड कलाकार ड्रग्ज का घेतात??” हा प्रश्न ऐकल्यावर ती काही सेकंद शांत राहते आणि मग उत्तर देते की, “बॉलिवूडमध्ये कोणताच कलाकार ड्रग्ज घेत नाही, इकडे सगळे पवित्र आहेत. तुम्ही सगळे याच इंडस्ट्रीमध्ये राहून देखील का टारगेट करत असता?? मंत्र्यांच्या मुलांना का नाही पकडत??”

यावर पॅपराजी तिला विचारतात की, “कोण मंत्री??” यावर ती म्हणते की, “मंत्र्यांची मुलं एका तासातच सुटतात.” यावेळी तिने कोणत्याही मंत्र्याचे नाव न घेता विषय इग्नोर केला.”

तिचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. तसेच तिला अनेक युजर्स ट्रोल करत आहे. एका युजरने लिहिले आहे की, “ही राखी कॅमेरा बघता क्षणी काहीही बोलायला सुरुवात करते.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “हिने देखील दुधाने अंघोळ केली आहे, बाकीच्यांसारखी.”

याआधी देखील राखीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात ती अशीच अनेक प्रश्नांची उत्तरं देताना दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.