अभिनेता विक्की कौशलचा ( vicky kaushal) ‘सॅम बहादूर’ हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. पुन्हा एकदा विकीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा चित्रपट देशातील पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपट पाहून परतणारे प्रेक्षक त्याचे भरभरून कौतुक करत आहेत. सचिन तेंडुलकरनेही आज विकी कौशलचा हा चित्रपट पाहिला आणि त्याचे मनापासून कौतुक केले.
आज मुंबईत क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांसाठी चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसोबत पोहोचला. त्यांच्याशिवाय झहीर खान आणि अजित आगरकर यांनीही चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये भाग घेतला होता. विकी कौशल देखील क्रिकेटच्या आयकॉन्ससोबत दिसला होता. स्क्रिनिंगदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
चित्रपट पाहिल्यानंतर सचिन तेंडुलकरने विकी कौशलच्या अभिनयाचे कौतुक केले. तो म्हणाला, ‘विक्कीच्या अभिनयाने मी खूप प्रभावित झालो आहे. चित्रपट पाहताना समोर सॅम माणेकशॉ असल्यासारखे वाटले. देहबोली उत्कृष्ट आहे. आपल्या सर्वांना आपल्या देशाचा इतिहास माहित असला पाहिजे, म्हणून मी म्हणेन की हा चित्रपट सर्व पिढ्यांनी पाहावा.
विकी कौशलचा ‘साम बहादूर’ हा चित्रपट मेघना गुलजारने दिग्दर्शित केला आहे. विकी कौशल व्यतिरिक्त यात फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी आणि मोहम्मद झीशान अय्युब सारखे स्टार्स देखील यात दिसत आहेत. रॉनी स्क्रूवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ बॉलिवूड चित्रपटांना रणबीर कपूरने दिला होता नकार, सुपरहिट झाल्यावर करावा लागला पश्चाताप
रणबीर कपूर-तृप्ती डिमरीचा न्यूड व्हिडिओ सीन सोशल मीडियावर व्हायरल, क्लिप पाहून चाहते हैराण