Wednesday, July 3, 2024

Sam Bahadur Box Office Collection: ‘सॅम बहादूर’च्या कमाईत मोठी घट; 14व्या दिवशी केली ‘एवढीच’ कमाई

1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये ‘सॅम बहादूर‘ (Sam Bahadur) आणि ‘अ‍ॅनिमल’ (Animal)हे चित्रपट प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटांंनी बाॅक्स ऑफिसवर (Box Office Collection ) चांगलीच कमाईची सुरूवात केले आहे. पण ‘अ‍ॅनिमल’च्या वादळात ‘सॅम बहादूर’ उडून गेला आहे. ‘सॅम बहादूर‘ची बाॅक्स ऑफिसवरची कमाईत मोठी घसरली झाली आहे. ‘सॅम बहादूर’ 100 कोटींच्या क्लबमध्ये अजून सामील होऊ शकलो नाही. त्यामुळे त्याच्या टिममध्ये निराशा पसरली आहे.

सॅम बहादूर‘  (Sam Bahadur ) फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा हा बायोपिक आहे. सॅमची भूमिका हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेता विकी कौशलने साकारली आहे. ‘राझी’ आणि ‘उरी’ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा पराक्रम सिद्ध करणाऱ्या विकीने ‘सॅम बहादूर’ची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील त्याच्या कामाचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी खूप कौतुक केले.

विकी कौशलचा (Vicky Kaushal ) चित्रपट ‘सॅम बहादूर’ खूप कौतुक झाले, पण कदाचित ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटामुळे या चित्रपटाची बोट बुडाली. चांगले रिव्ह्यू मिळूनही चित्रपटाची कमाई खूपच कमी होती. अवघ्या 6 कोटींनी बॉक्स ऑफिसवर खाते उघडणारा ‘साम बहादूर’; पहिल्या वीकेंडला 9 आणि 10 कोटींचा व्यवसाय केला. पण या आठवड्यात त्याची परिस्थिती बिकट राहिली आहे. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाला मोठा झटका बसला. (Vicky Kaushal movie Sam Bahadur Box Office Collection Day 14 )

दुसऱ्या रविवारी ‘सॅम बहादूर’ (Sam Bahadur)7 कोटींची उलाढाल केली होती. मात्र सोमवारपासून चित्रपट पुन्हा कमाईसाठी धडपडत होता. चित्रपटाने 13व्या दिवशी केवळ 2 कोटींचा व्यवसाय केला, तर 14व्या दिवशीची कमाई त्याहूनही कमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘सॅम बहादूर’ दुसऱ्या गुरुवारी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 1.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 64 कोटींवर पोहोचले आहे. हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यापासून अजूनही दूर आहे. (Vicky Kaushal Sam Bahadur Earned 14th Day at the Box Office)

आधिक वाचा-
Urfi Javed : ‘या’ सेलिब्रिटीने थेट घातली उर्फी जावेदला लग्नाची मागणी; अभिनेत्री म्हणाली, ‘लग्न करणार…’
Riteish-Genelia: रितेश देशमुख आणि जेनेलियाचा ‘तो’ व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, ‘व्हिडिओ बनवू नका…’

हे देखील वाचा