झोका खेळताना गेला तोल आणि पडली धपकन खाली, तरीही स्वत:च लागली जोरजोरात हसू, पाहा ‘कॉमेडी क्वीन’चा मजेदार व्हिडिओ

Video bharti singh felt while swinging funny instagram video goes viral


‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंग नेहमी प्रेक्षकांना पोट भरून हसायला भाग पाडते. तिची स्टाईलच अशी आहे की, जो तो तिला पसंत करू लागतो. गमतीदार विनोद असो किंवा मजेदार व्हिडिओ, आपल्या चाहत्यांना हसवण्याची एकही संधी ती सोडत नाही. भारती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. या दरम्यान भारतीने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे, जो चाहत्यांकडून खूप पसंत केला जात आहे.

वास्तविक, भारतीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक छोटी व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये भारती झोक्यावर बसून, झोका घेताना दिसत आहे. हा झोका झाडाला टांगलेला असून, पूर्णपणे देसी आहे. यात आपण पाहू शकतो की, भारती झोक्यावर मस्ती करत आहे. त्याचवेळी भारतीसोबत असलेली एक महिला तिला झोका देताना दिसत आहे. पण अचानक झोका घेत असताना, भारतीचा तोल बिघडतो आणि ती खाली पडते.

या व्हिडिओमध्ये सर्वात मजेशीर गोष्ट अशी आहे की, भारती सिंग झोक्यावरून खाली पडूनही, जोरजोरात हसत राहते. त्याचबरोबर चांगली गोष्ट म्हणजे, यावेळी भारतीला काही दुखापत झाली नाही. भारतीने या मजेदार व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “हॅप्पी संडे, गिर गिर से संभला जाता है, कमर तो गई!”

या अगोदरही भारतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, या व्हिडिओमध्ये, सर्वांना हसवणारी भारती स्वतः रडत होती. यामागचे कारणही तसेच होते. काही काळापूर्वी, भारतीच्या आईला कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्याबद्दल सोनू सूदला बोलताना भारती खूप रडली. इतकेच नव्हे, तर भारतीचे बोलणे ऐकून समोर बसलेला सोनूही आपले अश्रू आवरू शकला नाही आणि तोही रडला. हा व्हिडिओ ‘डान्स दीवाने’च्या एपिसोडचा होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिलबर गर्ल’ नोहा फतेहीकडून चाहत्यांना डान्सचे धडे; पाहा धमाकेदार स्टेप्स

-कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले मिलिंद सोमण; प्लाझ्मा दान करण्यासाठी करतायत जोरदार व्यायाम, पाहा व्हिडिओ

-खरंच! ‘मी दिशाला किस केले नाही’, असं का म्हणाला सलमान खान? पाहा बिहाईंड द सीन्स व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.