दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)अभिनीत ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अगदी वेड लावले आहे. सध्या पुष्पाचा बॉक्स ऑफिस आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर बोलबाला आहे. साउथमध्ये या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला असून, हिंदी व्हर्जनमध्ये देखील या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रेम मिळाले आहे. या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग अनेकांच्या ओठावर आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर या चित्रपटातील अनेक डायलॉग वापरून युजर्स भडीमार करत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.
‘पुष्पा’ चित्रपटातील एका डायलॉगने चाहत्यांना वेड लावले आहे. सोशल मीडियावर सध्या एका चिमुकलीचा ‘पुष्पा’ चित्रपटातील डायलॉग बोलतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. पुष्पा चित्रपटातील “पुष्पा पुष्पराज…” हा डायलॉग ही चिमुकली म्हणत आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यावरील हावभाव जबरदस्त दिसत आहेत.
तिचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील मूळ चित्रपटातील ‘पुष्पा’ला विसराल. या चिमुकलीच्या व्हिडिओवर युजर्स जोरदार कामेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. तिच्या या व्हिडिओला ३ मिलियनहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
‘पुष्पा’ हिंदी भाषेत हिट होण्यात मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे याचा सिंहाचा वाटा आहे. ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पात्राला श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे.
‘पुष्पा’ हा एक बिग बजेट चित्रपट असून, त्याची किंमत २५० कोटी आहे आणि त्याची निर्मिती मायथ्री मूव्ही मेकर्स आणि मटमसेट्टी मीडिया यांनी केली आहे. या चित्रपटात समंथा रुथ प्रभू देखील आहे. जी अल्लू अर्जुनसोबत आयटम गर्ल म्हणून डान्स करताना दिसत आहे. ‘पुष्पा: द राइज पार्ट १’ जबरदस्त ट्रेंड करत आहे आणि आता त्याच्या स्टार कास्टच्या अभिनयाची बॉलिवूडच्या सर्व सेलिब्रिटींनी प्रशंसा केली आहे.
हेही वाचा :