Monday, April 15, 2024

तब्बल 12 वर्षांनी विद्युत जामवालचे तमिळ चित्रपटसृष्टीत पुनरागमन, एआर मुरुगदासच्या चित्रपटात करणार काम

अलीकडेच साजिद नाडियादवालाने सलमान खानसोबत एका मेगा ॲक्शन चित्रपटाची घोषणा केली, ज्याचे दिग्दर्शन दक्षिणेचे दिग्गज दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास करणार आहेत. पण या चित्रपटापूर्वी एआर मुरुगदास शिवकार्तिकेयनसोबतच्या चित्रपटात व्यस्त आहे. आता ‘क्रॅक’ अभिनेता विद्युत जामवाल याने या चित्रपटात प्रवेश केल्याची बातमी समोर आली आहे. या चित्रपटात विद्युत शिवकार्तिकेयन सोबत दिसणार आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, एआर मुरुगादासच्या चित्रपटात विद्युत जामवालच्या सहभागाबद्दल लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल. असे झाल्यास विद्युत १२ वर्षांनंतर तामिळ चित्रपटसृष्टीत परतेल. याआधी विद्युत AR मुरुगदास यांच्या 2012 मध्ये आलेल्या ‘थुप्पाक्की’ या सुपरहिट चित्रपटात दिसला होता. आता ही बातमी समोर आल्यानंतर चाहते या प्रकल्पाच्या अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

विजय ‘थुप्पाक्की’मध्ये मुख्य अभिनेता म्हणून दिसला होता, तर विद्युत जामवालने स्लीपर सेल लीडरची भूमिका साकारली होती, जी लोकांना खूप आवडली होती. आता विद्युत पुन्हा एकदा एआर मुरुगादास यांच्या दिग्दर्शनाखाली काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री रुक्मिणी वसंतही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एनव्ही प्रसाद यांच्या श्री लक्ष्मी मुव्हीज बॅनरखाली होत आहे. दरम्यान, या चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध रविचंदरने दिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सुशांत ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेला दिलासा, इतके दिवस कारवाई होणार नाही
फूड डिलिव्हरी ॲपवर भडकली ट्विंकल खन्ना; म्हणाली, ‘शाकाहारी लोकांना शुद्ध आणि इतरांना अशुद्ध म्हणणे चुकीचे आहे’

हे देखील वाचा