Friday, July 5, 2024

Liger Glimpse Video: विजय देवरकोंडाने दाखवली जबरदस्त ऍक्शन, आक्रमक लूक पाहून येईल अंगावर काटा!

विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बहुप्रतिक्षित ‘लायगर’ (Ligar) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. २०२१ च्या शेवटच्या दिवशी चाहत्यांना भेट देत, निर्मात्यांनी चित्रपटाची पहिली झलक सादर केली आहे. पूर्णपणे स्पोर्ट्स ड्रामावर आधारित या चित्रपटाची पहिली झलक पाहिल्यानंतरच तुम्हाला चित्रपटाची कल्पना येईल आणि कदाचित चित्रपटाची वाट पाहणे तुमच्यासाठी आणखी कठीण जाईल. चित्रपटातील विजय देवरकोंडाचा ‘रफ ऍंड टफ’ लूक खूपच प्रभावी आहे. सोबतच निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.

हा चित्रपट पुढील वर्षी, म्हणजेच २०२२ मध्ये २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. विजय देवरकोंडाची जबरदस्त ऍक्शन आणि फायटर स्टाइल ५३ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली आहे. यात बॉक्सिंग रिंगमध्येही तो दमदार ऍक्शन करताना दिसत आहे. चित्रपटाची कथा एका किक बॉक्सरची आहे, जो मुंबईच्या झोपडपट्टीत वाढला आहे. तो चहाचे दुकान चालवतो पण नंतर तो बॉक्सिंगच्या क्षेत्रात देशाचे प्रतिनिधित्व करतो. यादरम्यान, त्याला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते, ते सर्व चित्रपटात दाखवले आहे. (vijay deverakonda starrer liger first glimpse released see poster)

विजय देवरकोंडाचा हा चित्रपट सर्वत्र चर्चेत आहे आणि हा धमाल करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे, जो हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. विजय देवराकोंडाचे हिंदी भागातही चांगले चाहते आहेत. त्याचा ‘अर्जुन रेड्डी’ही हिंदी प्रेक्षकांना विशेष आवडला होता. प्रेक्षकांना त्याला कठोर आणि आक्रमक मोडमध्ये पाहायला आवडते.

पुरी जगन्नाथ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याचवेळी कलाकारांबद्दल बोलायचे झाले, तर विजय देवरकोंडा व्यतिरिक्त अनन्या पांडे, रम्या कृष्णन आणि रोनित रॉय देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात दिग्गज बॉक्सर माईक टायसनही दिसणार आहे.

माईक टायसनचा हा पहिला भारतीय चित्रपट आहे. अनन्या पांडेही या चित्रपटातून साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. त्याचबरोबर ‘लायगर’मध्ये रोनित रॉय विजय देवरकोंडाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षक आता या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा