Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड विजय देवरकोंडा पडला ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात; म्हणाला, ‘मी तिला…’

विजय देवरकोंडा पडला ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात; म्हणाला, ‘मी तिला…’

सध्या दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि सारा अली खान यांच्या प्रेमप्रकरणाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. मात्र याबद्दलचा खुलासा दोघेही करायला तयार नाहीत. मात्र अलिकडेच अभिनेता विजय देवरकोंडाने त्यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे, ज्यामुळे आणखी चर्चांना उधाण आले आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. 

वास्तविक सारा अली खान अलीकडेच ‘कॉफी विथ करण सीझन 7′ मध्ये आली होती. इथे तिला डेट करायला आवडेल अशा मुलाचे नाव विचारले होते? यावर साराने विजय देवरकोंडाचे नाव घेतले. आता जेव्हा अभिनेत्याला विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, साराचा तो एपिसोड पाहिल्यानंतर त्याने साराला मेसेज केला आहे. तो म्हणतो ठीक आहे, मी एक चांगला अभिनेता आहे. मी तिला मेसेज केला होता. त्याने असे बोलले हे छान आहे.’

त्यानंतर अभिनेता विजय देवरकोंडा यालाही विचारण्यात आले की, त्याला तिला डेट करायला आवडेल का, तर विजय म्हणाला, ‘मला रिलेशनशिप हा शब्दही नीट सांगता येत नाही. मी यात कसा असू शकतो?’ सारा अली खान आणि जान्हवी कपूर या दोघीही ‘कॉफी विथ करण’मध्ये पोहोचल्या होत्या. येथे करणने सारा अली खानला त्या अभिनेत्याचे नाव विचारले ज्यावर सारा अली खान क्रश आहे. सुरुवातीला साराने करणला उत्तर देण्यास नकार दिला होता. पण नंतर ती हळूहळू विजय देवराकोंडाचे नाव घेते. हे ऐकून जान्हवी कपूर हसायला लागते.

तसे, विजय देवरकोंडा त्याच्या ‘लिगर’ चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. यात त्याच्या विरुद्ध अनन्या पांडे आहे. या चित्रपटात सौम्या कृष्णनही दिसणार आहे. हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर माईक टायसन या चित्रपटात कॅमिओ करणार आहे.

‘लोक किती निर्लज्जपणे खोटे बोलतात…’ अभिनेते शैलेश लोढा यांनी ‘तारक मेहता’ च्या निर्मात्यांवर केली टिका

‘या’ मराठी चित्रपटात झळकणार बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह; म्हणाली, ‘हा अनुभव एकदम…’

‘या’ मराठी चित्रपटात झळकणार बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह; म्हणाली, ‘हा अनुभव एकदम…’

हे देखील वाचा