Friday, March 31, 2023

‘लोक किती निर्लज्जपणे खोटे बोलतात…’ अभिनेते शैलेश लोढा यांनी ‘तारक मेहता’ च्या निर्मात्यांवर केली टिका

टीव्हीचा सुपरहिट कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या स्टारने शो सोडल्यानंतर वादात सापडला आहे. या शोला जवळपास 14 वर्षे पूर्ण झाली असून आतापर्यंत अनेक व्यक्तिरेखा बदलल्या आहेत. अलीकडे या शोचे निर्माते आणि स्टार कलाकार यांच्यात वाद सुरू आहे. या शोमध्ये तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांची एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. तारक मेहता मालिकेच्या निर्मात्याच्या विधानाविरोधात हे त्यांचे (शैलेशचे) उत्तर असल्याचे मानले जाते. यावर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. 

अलीकडेच, शोचे निर्माते असित मोदी यांनी कलाकारांनी सतत शो सोडल्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया दिली होती, त्यानंतर शैलेश लोढा यांची एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शैलेश लोढा यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लिहिले की, “तेरे मेरे रिश्ते का यही एक हिसाब रहा, मैं दिल ही दिल रहा तू सदा दिमाग रहा.” यावर सोशल मीडिया युजर्स आणि चाहते शैलेश लोढा ही पोस्ट शोच्या निर्मात्याच्या विधानाशी जोडून पाहत आहेत. असित मोदींना उत्तर म्हणून शैलेश लोढा यांनी ही पोस्ट लिहिली असल्याचे यूजर्सचे म्हणणे आहे. याशिवाय त्यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये  लिहिले  “लोक निर्लज्जपणे खोटे बोलतात” असे म्हणले आहे.

वास्तविक, काही दिवसांपूर्वी तारक मेहता शोचे निर्माते असित मोदी यांनी मीडियाशी संवाद साधला होता. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की शैलेश लोढा यांनी शो का सोडला? यावर निर्माते म्हणाले होते, मला सगळ्यांना जोडून ठेवायचे आहे. पण कुणाला सोबत यायचे नसेल आणि पोट भरले असेल तर त्यांना वाटेल ते करा. आम्ही खूप काही केले आहे. त्याला (शैलेश लोढा) वाटते की, तो फक्त तारक मेहतापुरता मर्यादित राहू नये. मी त्यांना एवढेच सांगेन की पुन्हा एकदा विचार करा आणि समजून घ्या. जुने तारक मेहता आले तरी आनंद होईल आणि नवीन आले तरी आनंद होईल. प्रेक्षकांना खूश करणे हे माझे एकमेव ध्येय आहे.”

हेही वाचा –

धक्कादायक! राजू श्रीवास्तव यांच्या भावालाही केले रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये उपचार सुरू

रक्षाबंधन स्पेशल I ‘एक हजारों मेरी बहना है’, ‘या’ गाण्यांनी वाढवला भाऊ बहिणींच्या नात्यातील गोडवा

खरचं की काय? अभिनेत्री उर्वशी रौतेला करणार होती चार मुले असणाऱ्या गायकासोबत लग्न, स्वतः केला खुलासा

हे देखील वाचा