Friday, April 25, 2025
Home मराठी ‘स्पर्धाच घेऊ नका…’ पुरुषोत्तम करंडकाच्या निकालावर विजू माने यांची संतप्त प्रतिक्रिया, पोस्ट व्हायरल

‘स्पर्धाच घेऊ नका…’ पुरुषोत्तम करंडकाच्या निकालावर विजू माने यांची संतप्त प्रतिक्रिया, पोस्ट व्हायरल

मराठी कलाक्षेत्रात मानाची समजली जाणारी पुरुषोत्तम करंडक ही एकांकिका स्पर्धा सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेली ही स्पर्धा नुकतीच पार पडली. मात्र या स्पर्धेच्या निकालाने सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासात कधीही न घडलेली घटना घडली आहे ज्यामुळे अनेक कलाकारांनी यावर जाहीर नाराजी दर्शवली आहे. हा निकाल म्हणजेच एकही एकांकिका पहिल्या क्रमांकासाठी पात्र नाही म्हणत कोणालाही करंडक मिळणार नसल्याचे जाहिर केले आहे. याच घटनेवर तिव्र विरोध दर्शवणारी दिग्दर्शक विजू माने यांची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. 

विजू माने (Viju Mane) हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. ते त्यांच्या चित्रपटांइतकेच सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. विजू माने त्यांच्या स्पष्ट आणि रोखठोक विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. नुकत्याच झालेल्या पुरूषोत्तम करंडकाच्या धक्कादायक निकालावर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या पोस्टमध्ये ते म्हणतात की, “निषेध. मी ही स्पर्धा पाहिलेली नाही त्यामुळे एकांकिकांच्या दर्जाबद्दल मी बोलू शकत नाही, परंतु या वृत्तीचा मला कायम राग येतो. एखाद्या धावण्याच्या स्पर्धेत धावणारे पाच जण असतील तर त्यात सगळ्यात पुढे असेल तो पहिला येणं हे सामान्य स्पर्धेतले लॉजिक इथे का लावलं जात नाही? मुळात अमुक एक दर्जा असलेल्या एकांकिका हव्या आहेत असं जर परीक्षकांना वाटत असेल, तर त्यांनी प्राथमिक फेरीतच दर्जेदार एकांकिका नाहीत म्हणून स्पर्धा होणार नाही असं जाहीर करून टाकावं. म्हणजे दिवस-रात्र प्रयत्न करणाऱ्यांचा विनाकारण हिरमोड होणार नाही. एकांकिका करणाऱ्या मुलांना उगाच ‘नाडण्याची करणी’ करणारे असे परीक्षक मी एकांकिका करत असतानाही होते. तेव्हा सुद्धा माझं हेच मत होतं.”

“ज्या लोकांमध्ये स्पर्धा आहे त्या लोकांमधला जो उत्तम आहे त्याला पहिला क्रमांक द्या. तुम्ही तरी तुमच्या शाळेत 100 पैकी 100 मार्क कधी मिळवले होते का? पण म्हणून एखाद्या वर्गात 65 मार्क मिळवणारा मुलगा सर्वोच्च मार्क मिळवणारा असेल तर त्याला पहिला क्रमांक द्यायचा नाही ह्याला काय अर्थ आहे. मला तेव्हाही असं वाटायचं की आधी परीक्षकांची नावं जाहीर करा. मग आम्ही तशी एकांकिका सादर करू. दिवस काही फार बदललेले नाहीत.”

दरम्यान विजू माने यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- एवढी घेतली की चालताही येईना? व्हायरल व्हिडिओमुळे अभिनेत्री सारा अली खान झाली ट्रोल
निशी सिंग यांनी मागितलेली ‘ही’ गोष्ट, पण शेवटची इच्छाही होऊ शकली नाही पूर्ण
आपल्या आवाजाने तरुणांच्या मनावर राज्य करणारे लकी अली तीन लग्न होऊनही राहिले ‘अनलकी’

 

हे देखील वाचा