लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री निशी सिंग भाडली यांच्या मृत्यूने मनोरंजन जगतात शोककळा पसरली आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या निशी सिंग यांचा मोठा चाहतावर्ग होता. ‘कुबूल है’, ‘इश्कबाज’, ‘तेनाली राजा’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते. अभिनेत्रीच्या कुटुंबासाठी तसेच चाहते आणि टीव्ही इंडस्ट्रीसाठी ही अत्यंत दु:खद बातमी आहे. अभिनेत्री बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. गेल्या तीन वर्षांत त्यांना चार वेळा अर्धांगवायूचा झटका आला होता. एका मीडिया हाऊसशी बोलताना अभिनेत्रीचे पती संजय सिंह यांनी निशी सिंगचे शेवटचे दिवस कसे होते हे सांगितले.
अभिनेत्री निशी सिंग 50 वर्षांची होती आणि कुटुंबाने 16 सप्टेंबरलाच तिचा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्रीच्या पतीने सांगितले की, जरी ती आजारी होती आणि चालणे आणि बोलू शकत नसली तरी ती खूप आनंदी दिसत होती. अभिनेत्री निशी सिंहचे पती संजय सिंह यांनी सांगितले की, घशात इन्फेक्शनची समस्या असल्याने काही काळापासून फक्त द्रव पदार्थ दिले जात होते. तिला बेसनाचे लाडू खूप आवडायचे. म्हणून तिने विनंती केल्यावर मी त्यांना जेवू घातले.
संजय सिंग यांनी सांगितले की, अभिनेत्रीच्या प्रकृतीमुळे त्यांना तिच्यासोबत राहावे लागले आणि उपचारासाठी खूप खर्च झाला. यादरम्यान टीव्ही इंडस्ट्रीतील अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. दिग्दर्शक रमेश तौरानी यांची मुलगी स्नेहा, कुबूल है मालिकेचे निर्माते गुल खान आणि अभिनेत्री सुरभी चंदना यांनी आर्थिक मदत केली.
निशी सिंगच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने टीव्ही मालिकांसोबतच चित्रपटांमध्येही काम केले. दिग्गज अभिनेत्री तिच्या नकारात्मक भूमिकांसोबतच कॉमिक भूमिकांसाठी ओळखली जात होती. ती जवळपास 8 वर्षे इंडस्ट्रीमध्ये सक्रिय राहिली आणि यादरम्यान मान्सून वेडिंग या चित्रपटात दिसली.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा- ‘या’ अभिनेत्रींची एमएमएस लीक झाल्याने उडाली होती खळबळ; थेट करिअरवर झाला होता परिणाम
नेहा कक्करच्या बोल्ड लूकवर संतापले नेटकरी; म्हणाले, ‘बाई तुझा डिझायनर …’
एआर रहमानच्या शिरपेचात मानाचा तुरा! मलेशियात झाला मोठा गौरव, जाणून तुम्हालाही वाटेल अभिमान