Saturday, July 6, 2024

एकेकाळी कॉलेजची फी भरण्यासाठीही नसायचे पैसे, आज आहे बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेता

टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीने शनिवारी आपला 34 वा वाढदिवस साजरा केला. विक्रांतचा जन्म 3 एप्रिल, 1987 रोजी महाराष्ट्रात नागपूर येथे झाला होता. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी त्याने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या प्रवासाबद्दल…

विक्रांतने 2004 साली ‘कहा हूं मैं’ या टीव्ही मालिकेमधून पदार्पण केले. त्यानंतर त्याने ‘धरमवीर’, ‘बालिका वधू’, ‘कबूल है’, ‘बाबा ऐसा वर धुंडो’ यांसारख्या मालिकेमध्ये काम केले आहे. त्याला कलर्स टीव्हीवरील ”बालिका वधू’ या मालिकेतून खरी ओळख मिळाली. यामध्ये त्याने ‘मदन शाम सिंग’ याचे पात्र निभावले होते. यानंतर त्याने एँड टीव्हीवरील ‘बाबा ऐसा वर धुंडो’ या मालिकेमध्ये काम केले. तो ‘धूम मचाओ धूम’ यामध्ये देखील दिसला होता.

विक्रांतने ‘लुटेरा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शक ‘विक्रमादित्य मोटवानी’ हे होते. या चित्रपटात रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा हे मुख्य भूमिकेत होते. यानंतर त्याने ‘अ देथ इन द गुंज’ या चित्रपटात काम केले. त्याने ‘मिर्झापूर’, ‘क्रिमिनल जस्टीज’ या वेब सीरिजमध्ये देखील काम केले आहे. तसेच त्याने ‘ब्रोकन बट ब्युटीफूल’ या दुसऱ्या भागात काम केले आहे. तसेच ‘छपाक’ या चित्रपटात दीपिका पदुकोणसोबत काम केले आहे.

आज विक्रांत यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. पण त्याच्या आयुष्यात एक काळ असा आला होता की, त्याच्याकडे कॉलेजची फी भरण्यासाठी देखील पैसे नव्हते. त्यावेळी त्याची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती. तरीही त्याने कष्टाने त्याचे शिक्षण पूर्ण केले. विक्रांतने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला बूट आणि परफ्यूम खूप आवडतात, आणि त्याच्याकडे याचे खूप कलेक्शन आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लतादीदींचा सल्ला न ऐकणे हरिहरन यांना पडले होते महागात, १०लाख लोकांसमोर ओढवला होता महाकठीण प्रसंग

-‘हम युपी से है भैया!’ उत्तर प्रदेशातील असे कलाकार, ज्यांचं नाव घेतल्याशिवाय बॉलीवूडचं पानही हलत नाही

-‘आठ वर्ष डेटिंग केल्यानंतर सलमानने मला फसवलं,’ ‘या’ अभिनेत्रीने केलाय गंभीर आरोप

हे देखील वाचा