Thursday, April 18, 2024

विक्रांत मेस्सी वादाच्या भोवऱ्यात, श्री राम सीता यांच्यासंदर्भात केलेलं वादग्रस्त ट्वीट व्हायरल

12Th Fail फेम विक्रांत मेस्सी (Vikrant Messy) गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्या अभिनयामुळे चर्चेत असणारा विक्रांत सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. विक्रांतचे एक जुनं ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने श्री राम आणि सीता यांच्यासंदर्भात वादग्रस्त उल्लेख केला आहे.

विक्रांतने २०१८ मध्ये केलेलं ट्वीट सध्या चर्चेत आलं आहे. ज्यामध्ये विक्रांतने श्री राम आणि सीता यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट केले होते. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल विक्रांतने माफीदेखील मागितली. पण त्यापूर्वी अभिनेत्याने मुंबईतील वकिलासोबत केलेल्या संवादाचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

२०१८ मध्ये, अभिनेत्याने कठुआ आणि उन्नाव प्रकरणांवर चिंता व्यक्त करताना प्रभू राम आणि देवी सीता यांच्यातील संभाषणाचे व्यंगचित्र शेअर केले होते. आपल्या जुन्या ट्विटमध्ये देवी सीतेने रामाच्या ‘भक्तां’ऐवजी रावणाने पळवून नेल्याबद्दल दिलासा व्यक्त केला होता.

हे व्यंगचित्र शेअर करताना विक्रांतने “अर्धे भाजलेले बटाटे आणि अर्धे भाजलेले राष्ट्रवादी यामुळे फक्त पोटात दुखेल.’ अशा आशयाची कॅप्शनदेखील लिहिली होती. त्याच्या या ट्विटनंतर त्याला जनतेच्या रोशाला सामोरे जावे लागले. त्यानंतर विक्रांतने माफी मागितली आणि ट्विटमागचा उद्देश स्पष्ट केला.
व्हायरल होणाऱ्या त्याच्या या जुन्या ट्विटवर पुन्हा विक्रांतने ट्विट करत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. “2018 मधील माझ्या एका ट्विटबद्दल, मी काही शब्द सांगू इच्छितो. माझा हिंदू समुदायाला दुखावण्याचा, बदनाम करण्याचा किंवा अपमान करण्याचा हेतू नव्हता. पण विनोदाने केलेल्या ट्विटबद्दल मी विचार करतो. वृत्तपत्रातील व्यंगचित्राची लिंक न देताही मला माझा उद्देश मांडता आला असता. ज्यांना मी ठेच पोहचवली आहे, त्यांची सर्वांची मी नम्रपणे माफी मागू इच्छितो.

विक्रांत पुढे म्हणाला, आत्तापर्यंत तुम्हा सर्वांना माहीतच आहे की, मी सर्व धर्म, श्रद्धा आणि धर्मांना माझ्याकडून शक्य तितका आदर देतो. आपण सर्वजण काळाबरोबर मोठे होतो आणि आपल्या चुकांवर विचार करतो. जसे की मी ही करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘माझ्या मृत्यूच्या खोट्या बातमीतून अनेकांनी पैसे कमवले’, पोस्ट शेअर करत पूनम पांडेने केले गंभीर आरोप
सर्वोत्कृष्ट अभिनेता झाल्यावर भावुक झाला किंग खान; म्हणाला, ‘मला वाटले हा पुरस्कार कधीच मिळणार नाही’

हे देखील वाचा