Monday, July 8, 2024

साऊथच्या चित्रपट कथेलाही लाजवेल अशी आहे अभिनेता सुदीपची लवस्टोरी, आधी घेतला घटस्फोट अन पुन्हा…

कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी माध्यमांमध्ये चर्चेत येत असतो. काही दिवसांपूर्वीच सुदीपने हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर अभिनेता अजय देवगण आणि सुदीपमध्ये चांगलेच शीतयुद्ध पाहायला मिळाले होते. यावेळी किच्चा सुदीप माध्यमांमध्ये चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतर आता किच्चा सुदीपचा विक्रम रोणा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात किच्चा सुदीपची धमाकेदार भूमिका पाहायला मिळणार आहे. विक्रम रोणा प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता किच्चा सुदीपच्या लवलाईफचीही जोरदार चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे. काय आहे अभिनेत्याच्या लवस्टोरीची किस्सा चला जाणून घेऊ. 

किच्चा सुदीप हा कन्नड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि डॅशिंग लूकने त्याने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुदीपच्या प्रत्येक चित्रपटात धमाकेदार लवस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळत असते. विशेष म्हणजे त्याच्या चित्रपटांइतकीच त्याचीही लवस्टोरी रंजक आणि मजेशीर आहे. किच्चा सुदीपने प्रिया राधाकृष्णनसोबत विवाह केला आहे.

सुदीप आणि प्रियाची भेट बेंगलोरमध्ये झाली होती. प्रियाने एअरलाईन कंपनी आणि बॅंकेत काम केले होते. जवळपास दोन वर्षानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली. दोघांना एक मुलगीही आहे. त्यांचा संसार सुरळित चालू असतानाच त्यांच्या नात्यात दुरावा आला. हा दुरावा इतका वाढला की दोघांनी वेगळे होण्याचाही विचार केला होता. घटस्फोटासाठी अर्जही केला होता. ते दोघे एकत्रही राहायला लागले होते. परंतु त्यांच्या मुलीसाठी ते एकत्र येत होते. त्यामुळेच त्यांचे नाते पुन्हा नव्याने बहरत गेले. मुलीला एकटेपणाची जाणीव होऊ देऊ नये असाच त्यांचा प्रयत्न होता. ज्यामुळे त्यांनी या निर्णयाचा पुर्नविचार केला. त्यांचा हाच निर्णय योग्य ठरला असून दोघेही सध्या आनंदी आयुष्य जगत आहेत.

दरम्यान, किच्चा सुदीपने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. तो सलमान खानच्या दबंग ३ चित्रपटात झळकला होता. त्याचबरोबर रण, मक्खी सारख्या चित्रपटातही त्याने काम केले आहे.

 हेही वाचा-

वादात सापडल्या रत्ना पाठक शाह, करवा चौथला अंधश्रद्धा म्हणत उडवली महिलांची टिंगल

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकांनी केली म. गांधींच्या बायोपिक सिरीजची घोषणा, ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका

बॉलिवूडमध्ये चित्रपट फ्लॉप का होत आहेत? अनुराग कश्यपने केलं मोठं विधान

हे देखील वाचा