Thursday, May 23, 2024

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकांनी केली म. गांधींच्या बायोपिक सिरीजची घोषणा, ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका

सध्या सिनेमागृहात तसेच ओटीटी फ्लॅटफॉर्मवर अनेक नाविण्यपूर्ण विषयांवरील चित्रपट तसेच वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अनेक ऐतिहासिक चित्रपटांसोबतच विविध नेत्यांच्या तसेच समाजसुधारकांच्या वेबसिरीजही तयार होत असून त्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर लवकरच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावरील वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोकप्रिय निर्माते आणि दिग्दर्शक हंसल मेहता हे या सिरीजची निर्मिती करणार आहेत. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, हायवे, स्कॅम १९९२ सारख्या लोकप्रिय वेबसिरीज तयार करणारे दिग्दर्शक हंसल मेहता त्यांच्या दमदार आणि नाविण्यपूर्ण निर्मितीसाठी ओळखले जातात. लवकरच ते महात्मा गांधी यांच्यावरील वेबसिरीज तयार करणार आहेत. रामचंद्र गुहा यांच्या दोन पुस्तकांवर आधारित आगामी वेबसिरीज “गांधी” दिग्दर्शित करण्यासाठी चित्रपट निर्माता हंसल मेहता यांनी तयारी दर्शवली आहे.  ‘गांधी बिफोर इंडिया’ आणि ‘गांधी – द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड’ या पुस्तकांवर आधारित ही सिरीज असणार आहे.  या सिरीजमध्ये अभिनेता प्रतीक गांधी महात्मा गांधींची भूमिका साकारणार आहे.

याबद्दल बोलताना हंसल मेहता यांनी सांगितले की, “जेव्हा तुम्ही महात्मा गांधींसारख्या ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित व्यक्तिरेखेबद्दल बोलत असता, तेव्हा एक चित्रपट निर्माता म्हणून तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. ती प्रत्यक्षात आणण्याची आमची इच्छा आहे. शक्य तितके आणि रामचंद्र गुहा यांच्या कार्याच्या पाठिंब्यामुळे, आम्हाला खात्री आहे की आम्ही प्रेक्षकांना आवडेल असे काहीतरी घेवून येण्याचा प्रयत्न करु.”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hansal Mehta (@hansalmehta)

 

याबद्दल अधिक बोलताना निर्माते समीर नायर म्हणतात की, “महात्मा गांधींची कथा ही एका महापुरुषाच्या कथेपेक्षा अधिक आहे. ही एका राष्ट्राच्या जन्माची आणि इतर अनेक नाटककारांचीही कथा आहे, ज्यांनी गांधींसोबत भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. आम्हाला ही सिरीज आणण्यासाठी तगडा दिग्दर्शक हवा होता आणि हंसल मेहता यांच्यारुपामध्ये तो आम्हाला भेटला.” दरम्यान दिग्दर्शक हंसल मेहता यांची स्कॅम १९९२ ही वेबसिरीजही प्रचंड गाजली होती. प्रेक्षकांना या सिरीजने वेड लावले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा –

सई मांजरेकरचं हे ग्लॅमरस फोटोशूट नाही पाहिलं तर काय पाहिलं…

बॉलिवूडमध्ये चित्रपट फ्लॉप का होत आहेत? अनुराग कश्यपने केलं मोठं विधान

अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीवर आलीये वाईट वेळ, मोमोज विकून भरतीये पोट

 

हे देखील वाचा