Saturday, July 27, 2024

बॉलिवूडमध्ये चित्रपट फ्लॉप का होत आहेत? अनुराग कश्यपने केलं मोठं विधान

वर्ष २०२२ सुरू होऊन ६ महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे आणि या वर्षी बॉलिवूड चित्रपट हिटपेक्षा जास्त फ्लॉप होत आहेत. दुसरीकडे, साऊथचे चित्रपट चांगली कमाई करत आहेत. अशा परिस्थितीत, गेल्या काही दिवसांपासून साऊथ विरुद्ध बॉलिवूड हा मुद्दा चांगलाच तापला आहे. यावर अनेक सेलेब्सनी आपले मत मांडले आहे. आता एका मुलाखतीदरम्यान अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) बॉलिवूडमध्ये चित्रपट फ्लॉप होण्याचे कारण सांगत चित्रपट निर्मात्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे.

सर्वांना माहित आहे की, अनुराग कश्यप सध्या ‘दोबारा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनुराग कश्यपच्या या चित्रपटात तापसी पन्नू (Taapsee Pannu) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘दोबारा’च्या ट्रेलर लाँचच्या वेळी अनुराग कश्यप हिंदी चित्रपटांच्या खराब व्यवसायाबद्दल बोलले. हिंदी चित्रपट फ्लॉप होण्याचे कारण देत अनुराग कश्यप म्हणाले की, आजकाल चित्रपट निर्माते प्रेक्षकांना प्रभावित करण्यासाठी त्यांच्या शैलीबाहेर जात आहेत आणि ही गोष्ट मोठ्या प्रमाणातील प्रेक्षकांना समजत नाहीये. (director anurag kashyap on bollywood filmmakers)

इंग्रजी भाषा बोलणारे जर हिंदी चित्रपट बनवू लागले, चित्रपटांची हालत काय होईल, असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्या मते, आता हिंदी चित्रपटसृष्टीत असे चित्रपट निर्माते आहेत, ज्यांना हिंदीही बोलता येत नाही आणि ती गोष्ट त्यांच्या चित्रपटांमध्येही दिसून येते.

वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात अनुराग कश्यप
ही काही पहिलीच वेळ नाहीये. अनुराग कश्यप अनेकदा अशी वक्तव्ये देत असतात, ज्यामुळे नंतर ते वादाच्या भोवऱ्यात सापडतात. त्यांच्या ‘दोबारा’ चित्रपटावर असे आरोप झाले आहेत की, हा विदेशी चित्रपट ‘मिराज’चा रिमेक आहे. मात्र त्यांनी हे स्वीकारण्यास नकार दिला आणि रिमेक चित्रपट बनवण्यावर आपला विश्वास नसल्याचे सांगितले.

‘दोबारा’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा एक सस्पेन्स थ्रिलर आहे, जो १९ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा