Tuesday, May 21, 2024

कॉमेडियन कुशल बद्रिकेच्या पोस्टने उडाली खळबळ, सोशल मीडियावर व्यक्त केला संताप

चला हवा येऊ द्या‘ फेम अभिनेता कुशल बद्रिके याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना हसवून वेड लावले आहे. त्याची अनिल कपूरची भूमिका असो किंवा सुनिल शेट्टीची भूमिका असो त्याने अप्रतिम कॉमेडीने लोकांना हसवले आहे. कुशलने अनेक चित्रपटामध्ये देखिल काम केले आहे. अभिनयासोबतच त्याला कविता करणे आणि लिहिण्यााला आवडते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हासू आणनारा अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

अभिनेता आणि कॉमेडियन कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा ‘चला हवा येऊ द्या’ या कर्यक्रमामुळे घराघरात पोहोचला. नुकतंच अभिनेता एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला होता, तेव्हा त्याने एक सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर एका पोर्टलने त्याच्याबद्दल चुकीची बातमी दिली होती, त्यामुळे अभनेत्याने संताप व्यक्त केलाय.

झाले असे की, कुशल बद्रिके गुरुवार (दि. 10 नोव्हेंबर) दिवशी लंडनला जात असताना इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती, त्यामध्ये त्याने एकट्याने परदेशात प्रवास केल्याबद्दल माहिती दिली होती. या पोस्टनंतर एका वेबसाईटने ‘शेवटचा प्रवास मात्र एकट्यानेच…अभिनेता कुशल बद्रिकेच्या पोस्टने उडाली खळबळ!’ या हेडलाईनने एक बातमी केली होती. कुशल बद्रिकेने ही बातमी वाचल्यानंतर कुशलने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

बद्रिकेन आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर स्टोरी शोअर करत त्याने बातमीचा स्कीनशॉट पोस्ट केला असून त्याने वेबसाईटला मोलाचा सल्ला देत लिहिले की, “कमालीचे बातमीदार… हे असं मांडणारा माणूस रात्री सुखाने झोपू शकतो? देव यांना सदबुद्धी देवो”, अशा तिकट शब्दात त्याने नाराजी दाखवली. सध्या त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कुशलच्या सोशल मीडिया पोस्टने सर्वत्र खळबळ माजली आहे. त्याने बातमीदाराला चांगलाच धडा शिकवला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी भरत जाधवने लढवली अनोखी शक्कल, वाचून तुम्हीही म्हणाल ‘एकच नंबर’
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांचा एसटीमधील जुना फोटो शेअर करून सांगितला अनुभव

हे देखील वाचा