Thursday, November 21, 2024
Home बॉलीवूड असा क्रूर खलनायक, ज्याच्या नावात जरी ‘प्रेम’ असले, तरी चित्रपटांमध्ये ‘ते’ कधीही दिसले नाही

असा क्रूर खलनायक, ज्याच्या नावात जरी ‘प्रेम’ असले, तरी चित्रपटांमध्ये ‘ते’ कधीही दिसले नाही

अनेक चित्रपटांमध्ये नायकापेक्षा खलनायकाची भूमिका खूप दमदार मानली जाते. अशात ‘प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा’ हा डायलॉग आजही ऐकला, तरी अनेकांच्या काळजात धडकी भरते. खलनायक प्रेम चोप्रा यांनी आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटातील हिरोंना देखील मागे सारले. त्यांच्या अभिनयाने त्यांनी लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी आपल्या चित्रपटांमध्ये २५० हुन अधिक बलात्काराचे सिन केले आहेत. गुरुवार (२३ सप्टेंबर) ते आपला वाढदिवस साजरा करतात. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या कारकिर्दी बद्दल.

अंगावर शहारे आणणाऱ्या प्रेम चोप्रा या खलनायाचा जन्म २३ सप्टेंबर १९३५ रोजी लाहोरमध्ये झाला. भारताच्या फाळणी नंतर आपल्या कुटुंबासह ते शिमलाला स्थायिक झाले. तिथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यांच्या वडिलांना त्यांना एक अधिकारी बनवायचे होते. परंतु अभिनयाकडे कल असलेल्या प्रेम चोप्रा यांना ते जमले नाही.

प्रेम चोप्रा आपल्या मनामध्ये अभिनय करण्याचे स्वप्न घेऊन मुंबईला आले. मुंबईमध्ये आल्यानंतर यांची चित्रपटांसाठीची मोठी धडपड सुरू झाली. घरामधून चित्रपटात काम करण्यास विरोध असल्याने त्यांना घरामधून काही सहकार्य मिळाले नाही. स्वप्नांची नगरी मुंबईमध्ये रहायचे, तर खिशात चार पैसे असणे सर्वात महत्वाचे. जवळ असलेले पैसे ऑडिशन देता देता संपले होते. त्यामुळे काही, तरी रोजगाराचा मार्ग निवडलाच पाहिजे म्हणून त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये नोकरी केली.

इंग्रजी वृत्तपत्रात नोकरी करत असताना त्यांना आठ दिवसांसाठी कामानिमित्त बाहेरगावी जावे लागले होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना एक प्रश्न विचारला. तो व्यक्ती म्हणाला की, “तुम्हाला चित्रपटामध्ये काम करायचे आहे का?” समोरून एखादी संधी चालून आली असे समजून प्रेम मोठ्या उत्साहात हो म्हणाले. मग काय सुरू झाली त्यांची चित्रपटांची कारकिर्द. तो व्यक्ती त्यांना रणजित स्टुडिओमध्ये घेऊन गेला. तिथे त्यांची ओळख जगजीद सेठी यांच्या बरोबर झाली. त्यावेळी त्यांना ‘चौधरी कर्नल सिंग’ चित्रपटासाठी एका अभिनेत्याची गरज होती. त्यांना प्रेम आवडले आणि अशा पद्धतीने त्यांना या चित्रपटासाठी २५०० रुपये मानधन देत साईन केले गेले.

त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक बलात्काराचे सीन केले. परंतु एका सीनमध्ये अभिनेत्रीला त्यांचा राग आला. या सीनमध्ये प्रेम यांना त्या अभिनेत्रीला पाठीमागून येऊन जोरात पकडायचे होते. प्रेम, तर त्यांची भूमिका नीट साकारत होते, पण अभिनेत्रीला त्यावेळी जसे हावभाव दिगदर्शकांना पाहिजे होते तसे देता येत नव्हते. अभिनेत्रीचे असे म्हणणे होते की, प्रेम तिला जरा जास्तच जोरात पकडत आहेत. त्यानंतर खूप टेक घेऊनही सीन नीट होत नव्हता. अखेर कसा बसा सीन पूर्ण झाला. त्यानंतर अभिनेत्रीने प्रेम यांची तक्रार दिग्दर्शकांकडे केली. दिग्दर्शकांनी त्यांच्याशी या विषयी बातचीत केली, पण प्रेम यांना काही समजेल तोच पुढचा सीन तयार झाला. यामध्ये अभिनेत्री प्रेम यांना कानामागे मारणार होती. सीन सुरू होताच अभिनेत्री रागात त्यांच्या जवळ आली आणि जोरदार प्रेम यांच्या कानशिलात लगावली. अभिनेत्रीच्या अशा वागण्याने संपूर्ण सेटवर गंभीर शांतता पसरली.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रेम म्हणाले होते की, “नशिबाने मला नायक तर नाही बनवले पण उत्तम खलनायक बनवले. मला या गोष्टीचा खूप आनंद आहे. त्यावेळी चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेला फार महत्व होते. तसेच प्रेक्षक खलनायकाचे डायलॉग बरीच वर्षे लक्षात ठेवत होते. अनेक व्यक्ती मला पाहून त्यांच्या पत्नीला लगेच लपवायचे. माझ्या साठी माझ्या अभिनयाची हीच खरी पोचपावती होती.”

हिंदी चित्रपटांमध्ये त्यांची हिरोची भूमिका प्रेक्षकांना फार आवडत नव्हती. एका व्यक्तीने त्यांना खलनायकाच्या भूमिका साकारण्याचा सल्ला दिला आणि या सिनेसृष्टीला यशस्वी चित्रपट देणारा खलनायक मिळाला. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये ‘हम हिंदुस्तानी’, ‘वो कौन थी?’, ‘शहीद’, ‘मेरा साया’, ‘प्रेम पुजारी’, ‘कटी पतंग’, ‘दो अनजाने’, ‘काला सोना’, ‘दोस्ताना’, ‘क्रांति’, ‘जानवर’, ‘फूल बने अंगारे’, ‘महबूबा’ यासह अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

श्रीदेवी यांच्या हिट गाण्यावर जबरदस्त नाचली पाकिस्तानी अभिनेत्री आयजा खान

मंसूर अली खान पतौडींच्या पुण्यतिथी दिनी सोहा अली खान शर्मिला टागोर यांनी घेतले त्यांच्या कब्रचे दर्शन

फॅन्सला पुन्हा झाला बिग बॉस फेम सोनाली फोगट यांच्या जबरदस्त डान्सचा ‘दिदार’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा