Saturday, July 6, 2024

अवघ्या 15 वर्षांच्या पोराने लिहिले होते ‘काला चष्मा’ गाणे, आज पंजाब पोलिसात आहे हेड कॉन्स्टेबल

सन 2016मध्ये ‘बार बार देखो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा अभिनित या सिनेमातील ‘काला चष्मा’ हे गाणे चांगलेच गाजले होते. या गाण्यावर सामान्य लाेकांपासून  ते सेलिब्रेटींपर्यंत बरेच लाेक थिरकले. या गाण्यावरील चाहत्यांचे व्हिडिओ आणि रील्स साेशल मीडियावर व्हायरल हाेताना दिसतात. अशातच, ‘द क्विक स्टाईल’ या नावाचा ग्रूप लग्नसंमारभात या गाण्यावर परफॉर्म करताना दिसला. गाण्यावर त्यांचे डान्सिंग मूव्ह्ज कमालीचे हाेते. या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातली. त्यांच्या व्हिडिओला लाखाे व्ह्यूज मिळाले. मात्र, खूप कमी लोकांना माहिती असेल की, ‘काला चष्मा’ हे गाणे अवघ्या 15 वर्षांच्या मुलाने लिहिले होते.

‘काला चष्मा’ (Kala Chashma) या गाण्याला लाेकांनी खूप पसंत केले होते. हे पंजाबी गाणे मूळ स्वरुपात 90च्या दशकातील आहे. हाती आलेल्या वृत्तांनुसार, कपूरथला येथील पंजाब पाेलिसांमधील वरिष्ठ अधिकारी अमरिक सिंग शेरा या गाण्याच्या लेखकांपैकी एक आहेत.

जलंधर जवळील तलवंडी चौधरियान गावात राहणारे 43 वर्षीय अमरिक सिंग शेरा यांनी या गाण्याचे लेखन 1990 मध्ये (15 वर्षांचे असताना) केले हाेते. त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल की, इतक्या वर्षानंतर त्यांचं गाणं काेणत्या चित्रपटात वापरलं जाईल. अमरिक यांनी 2016 साली दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “2 महिन्यांपूर्वी मला माझ्या मित्राचा फाेन आला होता की, एका चॅनेलवर ‘काला चष्मा’ गाणे चालू आहे. मला माहिती नाही की, मी त्यावेळी काय अनुभवलं. मी आनंदी हाेताे, पण जे काही हाेत हाेतं ते बघून आश्चर्य देखील वाटलेलं.”

Amrik-Singh-Shera

रिपाेर्टनुसार, अमरिक सिंग शेरा यांच्याशी करार करून, त्यांची साईन घेऊन या गाण्यासाठी त्यांना केवळ 11 हजार रुपये मिळाले होते. ते म्हणाले की, जलंधर स्थित एंजेल रिकॉर्ड कंपनीने चार महिन्यांपूर्वी इतर गाण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला हाेता. ते म्हणाले, “मला सांगण्यात आले की, मुंबईमध्ये एका कंपनीने सिमेंट फर्मच्या उद्घाटनासाठी माझ्या गाण्याची गरज आहे. मला सिमेंट कंपनीचं नाव माहीत नाही. मला हे सांगण्यात आलं नव्हतं की, हे गाणं कुठल्या चित्रपटात वापरले जाईल.”

‘काला चष्मा’ या गाण्याबद्दल बोलायचं झालं, तर 27 जुलै, 2016 रोजी झी म्युझिक कंपनीच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. या गाण्याला आतापर्यंत 82 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
दररोज पाहायचे एकमेकांचे तोंड, तरीही 3 महिने पतीशी बोलली नव्हती श्रीदेवी; कारण धक्कादायक
‘मी फक्त एवढंच सांगू शकते…’, राजूच्या तब्येतीबद्दल पत्नीने दिली महत्त्वाची अपडेट
‘या’ अभिनेत्रीने बिकिनी घालून ट्रेनरसोबत केला जबरदस्त योगा; नेटकरीही म्हणाले, ‘उद्या घटस्फोट फिक्स’

हे देखील वाचा