Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड अक्षय कुमारचा जबरदस्त मोटिवेशनल वर्कआउट व्हिडिओ पाहून चाहते झालं चकीत; म्हणाले,’तू खरंच 55…’

अक्षय कुमारचा जबरदस्त मोटिवेशनल वर्कआउट व्हिडिओ पाहून चाहते झालं चकीत; म्हणाले,’तू खरंच 55…’

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) वयाच्या 55 ​​व्या वर्षीही त्याच्या फिटनेस आणि ऍक्टिव्हिटीसाठी ओळखला जातो. तो वेळेवर झोपतो आणि उठतो. सकाळी लवकर उठल्याने शरीर ताजेतवाने राहते आणि ते फिट राहते असा त्यांचा विश्वास आहे. सध्या अक्षय त्याच्या ‘राम सेतू’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. नुकताच त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर वर्कआऊटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.त्यात त्याने त्याच्या फिटनेसची झलक दाखवली आहे. या व्हिडिओमध्ये तो मंकी बार एक्सरसाइज करताना दिसतोय. हा व्यायाम करताना त्याची चपळाई आणि ताकद पाहून चाहते चकीत झाले आहेत.

अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये तो मंकी बार एक्सरसाइज करतानाही दिसत आहे. व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर, त्याच्या ‘चांदनी चौक टू चायना’ चित्रपटातील ‘चख लैन दे’ हे मोटिव्हेशनल गाणं लावलं आहे,हे कैलाश खेर यांनी गायले आहे. त्याच्या या व्हिडीओवर हे गाणं साजेसे आहे.

 

View this post on Instagram

 

हा व्हिडिओ शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले की, “ज्या दिवसाची सुरुवात याप्रकारे होते,तीच माझी सर्वोत्तम सकाळ असते, आणि तुमचे?” अक्षयचा हा वर्कआउट व्हिडिओ पाहून चाहते आश्चर्यचकित झाले असून त्याच्या फिटनेसचे कौतुक करत आहेत. या वयात अक्षयच्या अशा वर्कआऊटवर चाहत्यापासून कालारांपर्यंत प्रत्येकजण प्रतिक्रिया देत आहे. अभिनेता टायगर श्रॉफनेही अक्षयच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांना त्याला आपला ‘आदर्श’ म्हटलंय.

चाहते अक्षयचे कौतुक करत आहेत
अक्षय कुमारच्या या पोस्टवर एका यूजरने लिहिले, “आपला हिरो अजूनही तगडा आहे’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘तू खरंच 55 वर्षांचा आहेस का’, असा सवाल दुसऱ्याने केला. एकाने लिहिले, “ओ पाजी!! तुस्सी ग्रेट हो!”. कामाबद्दल बोलाचं झालं तर, अक्षयचा सेल्फी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत इमरान हाश्मी झळकणार आहे. याशिवाय सूर्याच्या ‘सूराराई पोट्रू’ या दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही तो मुख्य भूमिका साकारणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भाईजान नंतर बीग बीच्या जिवाला भीती, मुंबई पोलिसांनी दिली ‘एक्स’ सुरक्षा

ऐश्वर्याने मुलगी आराध्यासोबत सिद्धिविनायकाचे घेतले आशीर्वाद, फोटो शेअर करत चाहत्यांचे मानले आभार

हे देखील वाचा