Monday, July 1, 2024

तब्बल 3 वर्षानंतर प्रियंकाचे भारतामध्ये आगमन, आल्याबरोबर व्यक्ती केली भावनिक पोस्ट

बॉलिवूडची देसी गर्ल आणि अमेरिकेची सून अभिनेत्री प्रियंका चोपडा पुन्हा एकदा भारतामध्ये परतली आहे. मात्र, यावेळेस अभिनेत्री तब्बल तीन वर्षानी भारताचे दर्शन घेत आहे. प्रियंका जरी परदेशात असली तरी ती भारतीय संस्कृतीला जपते आणि आपल्या सासरीदेखिल सगळे सणसूध साजरी करत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने आजपर्यत अनेक गोष्टींवर बिंदास्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे अभिनेत्री तरुन पिढीसाठी एक आदर्श व्यक्तीमत्व बनली आहे.

लोप्रिय अभिनेत्री प्रियंका चोपडा (Priyanka Cgopra) हिने बॉलिवूडच नाही तर, हॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनयाने एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आज तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. चाहते तिच्याकडे ब्युटी विद ब्रेनच्या दृष्टीकोणाने पाहत असतात. तिने अनेक ठिकाणी आपल्या करिअरबद्दल सांगत लोकांना प्रेरणा दिली आहे. नुकतंच अभिनेत्री भारतामध्ये परतल्याचे सांगितले आहे. तिने सोमवारी (दि. 31 ऑक्टोंबर) दिवशी आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंवरुन चाहत्यांना सांगितले होते की, ती भारतामध्ये येणार आहे, आणि पोहोचल्यानंतर विमान लॅन्डस करताना तिने इंस्टग्रामवर स्टोरी देखिल शेअर केली होती. ज्यामध्ये लिहिले होते की, “अटारिया पर लौटी, उतर रही हूं.” यानंतर तिने पैपराजींना अभिवादनही केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अभिनेत्री कॅबमधून जात असताना मुंबईच्या रस्त्यावरचा व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये डायरेक्शन बोर्ड बांद्रा, मंत्रालय, अंदेरी आणि अनेक ठिकाणचे नाव दिसत होते. तिने एर टीव्ही स्क्रीन शेअर केली, ज्यावर करण जोहर (karan Johar)  याचा कार्यक्रम बघत होती. तिने फोटो शेअर करत लिहिले की, “आप मुंबई में नहीं अगर आपका टीवी पर करण जौहर से सामना नहीं होता.”

priyanka chora
Photo Courtesy : Instagram/priyankachopra

प्रियंकाने गुजरातमध्ये झालेल्या अपघाताबद्दलही दु:ख व्यक्त केले. तिने गुजरातमधील तुटलेल्या पुलाचा आणि मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा फोटो शेअर करत लिहिले की, “दिल दुखाने वाला… मेरी संवेदना उन सभी लोगों के लिए है, जो गुजरात में ब्रिज गिरने से प्रभावित हुए हैं. जो घायल हुए हैं उनके जल्द ठीक होने की कामना करती हूं. जिन लोगों का आज निधन हुआ उनके लिए मैं प्रार्थना करती हूं.”

priyankachopra
Photo Courtesy : Instagram/priyankachopra

प्रियंका चोपडा शेवटी 2019 मध्ये भारतामध्ये आली होती. तेव्हा तिचा चित्रपट ‘द स्काई इज पिंक’ प्रदर्शित झाला होता. चित्रपटामध्ये तिच्यासोबत फरहान अख्तर (Farhan A मुख्य भूमिकेत होता. चित्रपटाच्या प्रमोशन आणि प्रदर्शनानंतर ती पुन्हा लॉस एंजिल्समध्ये परतली होती आणि आता ती भारतामध्ये परतली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडचा कार अपघात, रुग्णालयात उपचार सुरु
‘स्तनाच्या कर्करोगा’बद्दल अभिनेत्री माहिरा खानचं मोठं वक्तव्य; म्हणाली, ‘पाकिस्तानामधील 9 पैकी एक महिला…’

हे देखील वाचा