Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड रणदीप हुड्डाने घडवले एक दोन नव्हे, तर तब्बल ६ वाघांचे दर्शन, पाहून तुम्हालाही फुटेल घाम

रणदीप हुड्डाने घडवले एक दोन नव्हे, तर तब्बल ६ वाघांचे दर्शन, पाहून तुम्हालाही फुटेल घाम

बॉलिवूड विश्वात रणदीप हुड्डाकडे रफ-टफ अभिनेता म्हणून पाहिले जाते. फक्त पडद्यावरच नाही, तर तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही असाच आहे. त्याची झलक सोशल मीडियावर अनेकदा दिसून येते. रणदीपला साहसाने भरलेले आयुष्य आवडते. म्हणूनच तो अनेकदा जंगलात फिरायला जातो. अनेकदा चर्चेत राहणाऱ्या या रणदीपने यावेळीही असेच काहीसे केले आहे. त्याने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्याने वाघाच्या कुटुंबाची झलक दाखवली आहे.

रणदीपने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक-दोन नव्हे, तर तब्बल ६ वाघांचे दर्शन एकाचवेळी घडवले आहे. या व्हिडिओमध्ये एक-दोन नव्हे, तर सहा वाघ मस्ती करत जंगलात फिरायला निघाले आहेत. प्रत्येकजण अगदी आरामात चालताना दिसतो. सर्व वाघ एका कारजवळ येत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. कॅमेऱ्याने शूटिंग करणाऱ्या लोकांकडे वाघ चालताना दिसत आहेत. मागून एक कारही येताना दिसत आहे.

हा व्हिडिओ नागपूरजवळील उमरेड कर्हांडला वन्यजीव अभयारण्यामधील आहे. रणदीपने व्हिडिओसोबत कॅप्शन शेअर करत ही माहिती दिली आहे. यासोबतच त्याने “छप्पर फाड के,” लिहिले आहे. खरंच, एवढे विस्मयकारक दृश्‍य छप्पर फाडून टाकतं. रणदीपला हा व्हिडिओ व्हॉट्सॲपवर मिळाला आहे.

वाईल्डलाईफ फोटोग्राफीचा शौकीन रणदीपला प्राण्यांबद्दल प्रचंड प्रेम आहे. काही काळापूर्वी त्याच्या इंस्टाग्रामवर जंगलाच्या राजाचे फोटो शेअर करून त्याने जीवनाचे तत्त्वज्ञान सांगताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “सूर्यप्रकाश आणि सावली जीवनाचा भाग आहेत. चालू राहिलेच पाहिजे.” चाहत्यांनी या फोटोंचे भरभरून कौतुक केले आहे.

मूळचा हरियाणाचा रहिवासी असलेल्या रणदीप हुड्डाने ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमधून शिक्षण पूर्ण केले आहे. मॉडेल- अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या रणदीपने २००१ मध्ये मीरा नायरच्या ‘मॉन्सून वेडिंग’ या चित्रपटातून पदार्पण केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फोटोत आजीसोबत बसलेल्या चिमुकल्याला ओळखलं का? आहे आपल्या वडिलांसारखाच सुपरस्टार

-काय सांगता! रानू मंडल ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत करणार काम, एकेकाळी स्टेशनवर मागायची भीक

-रंगीबेरंगी कपडे घालून कारमधून उतरली आलिया, अभिनेत्रीचा नखरा पाहून नेटकऱ्यांनी ऐकवले तिला खरे-खोटे

हे देखील वाचा