Friday, April 19, 2024

काय सांगता! रानू मंडल ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत करणार काम, एकेकाळी स्टेशनवर मागायची भीक

साल २०१९ मध्ये एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक महिला लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ गाणे गाऊन भीक मागत होती. रानू मंडल असे या महिलेचे नाव आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर रानू रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनली. त्यानंतर हिमेश रेशमियाने तिला आपल्या चित्रपटात गाण्याची संधी दिली.

‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गाऊन रातोरात स्टार बनलेल्या रानू मंडलचे दिवस बदलले आहेत. हिमेश रेशमियासोबत गाणाऱ्या रानूला आता आणखी एका चित्रपटात गाण्याची ऑफर आली आहे. मात्र तिला ही ऑफर बॉलिवूडमधून नाही, तर बांग्लादेशमधून आली आहे. बांग्लादेशमधील चित्रपट स्टार हिरो आलोमने निर्मित दोन वेगवेगळ्या चित्रपटांसाठी, रानू मंडलला दोन गाण्यांची ऑफर देण्यात आली आहे. (ranu mandal going to work with hero alom news goes viral)

या वृत्ताला बांग्लादेशी चित्रपट स्टार हिरो आलोमने स्वतः सोशल मीडियावर दुजोरा दिला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. रानूने पुन्हा एकदा प्रकाशझोतात यावे असे अनेकांना वाटत आहे, तर काही युजर्स अजूनही तिला ट्रोल करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीयेत.

हिमेश रेशमियाने रानू मंडलला पहिली संधी दिली होती. ‘हॅप्पी, हार्डी और हीर’ या चित्रपटात त्याने तिला दोन गाणी गाण्याची संधी दिली. या चित्रपटात रानू मंडलने ‘आशिकी में तेरी’ आणि ‘तेरी मेरी कहानी’ ही गाणी गायली आहेत. यासाठी तिला लाखो रुपये देखील मिळाले होते. मात्र ही लोकप्रियता रानूला व्यवस्थित सांभाळता आली नाही.

चित्रपटांनंतर रानूला स्टेज शो आणि फॅशन शोजच्या ऑफर्स आल्या. जिथे तिला तिच्या ऍटिट्यूडमुळे खूप ट्रोल करण्यात आले. इतकेच नाही, तर ती सिंगिंग शोचा भागही बनली. नंतर रानू मंडलला काम मिळाले नाही, परंतु अलीकडेच ती ‘बचपन का प्यार’ हे गाणे गाताना दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-KBC: शोदरम्यान स्पर्धकाने बिग बींना जया बच्चनबद्दल विचारला ‘असा’ प्रश्न, अभिनेत्याने शो सोडण्याची केली विनंती

-चार मुली जन्माला आल्यानंतर तुटले होते वडिलांचे मन, त्याच मुली आज बॉलिवूडवर गाजवतायत अधिराज्य

-‘सूर्यवंशी’मुळे पाकिस्तान त्रस्त! राष्ट्रपतींसह ‘या’ अभिनेत्रीने इस्लामोफोबियाबद्दल व्यक्त केली चिंता

हे देखील वाचा